सुरेश गंभीरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार अकलुज शहर अध्यक्षपदी पुन्हा एकदा शहराध्यक्ष म्हणून पुनर्नियुक्ती!

सोलापूर जिल्हा ग्रामीण शाखेचा महत्त्वाचा निर्णय; पक्ष संघटनात्मक बांधणीसाठी पाऊल
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

अकलुज : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या सोलापूर जिल्हा ग्रामीण शाखेने आज एक महत्त्वपूर्ण घोषणा करत,सुरेश गंभीरे यांची अकलुज शहर अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती केली आहे. पुन्हा एकदा या नियुक्तीमुळे पक्षाच्या शहर पातळीवरील कामाला अधिक गती मिळणार असून, संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीण शाखेच्या वतीने याबाबतचे नियुक्तीपत्र जारी केले आहे. सदर नियुक्तीपत्र खासदार धैर्यशील मोहिते पाटील,प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मणराव ढोबळे,जिल्हा अध्यक्ष वसंतराव देशमुख, कार्याध्यक्ष रविंद्र पाटील,महिला जिल्हाअध्यक्ष सवर्णाताई शिवपुरे, यांच्या हस्ते सुरेश गंभीरे यांना शुभेच्छा देत, त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.

”नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या अकलुज शहर अध्यक्षपदी आपली पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाची संघटनात्मक बांधणी आपण चांगली व प्रभावी कराल असा मला ठाम विश्वास वाटतो.असे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितले. पक्षाने सुरेश गंभीरे यांच्या कामावर विश्वास व्यक्त करत राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब यांचे विचार सर्वदूर पोहोचविण्यासाठी त्यांनी प्रयत्नशील राहावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील अकलुज शहरासाठी ही नियुक्ती पक्षाच्या विस्ताराच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. नवनियुक्त शहर अध्यक्ष सुरेश गंभीरे अकलुज ता. माळशिरस जि. सोलापूर यांना पक्षातर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे.



