गौण खनिज तस्करी पथकात.वरिष्ठ अधिकारी,सशस्त्र पोलीस व शासकीय वाहान असेल तरच तस्करी पथकात काम करणार मंडळ अधिकारी संघटनेचा इशारा.

प्रतिनिधी:- मायाताई सागर पाईकराव यवतमाळ
सविस्तर वृत असे की महागाव तालुक्यातील फुलसावंगी परिसरात मोठ्या प्रमाणात अवैद्य गौण खनिज उत्खनन करून त्याची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती महसूल विभागाला मिळाली होती.त्यावरून सदर गौण खनिज चोरी रोखण्यासाठी महसूल विभागाने मंडळ अधिकारी संजय नरवाडे यांच्या नेतृत्वात पथक निर्माण केले होते.
यावेळी सदर पथक बुधवारी नऊ वाजताच्या दरम्यान फुलसावंगी कडे जात असतांना त्यांना काळी येथील जिल्हा परिषद प्रार्थमिक शाळेच्या जवळ एक विना नंबरचा ट्रॅक्टर फुलंसावंगीच्या दिशेना जात असल्याचे आढळून आल्याने त्यांनी त्यास अडविले.यावेळी या ट्रॅक्टर चालकाची सविस्तर चौकशी केलीअसतांना कोणतीही परवानगी नसल्याचे आढळून आले.चौकशी दरम्यान अचानक काळी (टेंभी) येथून काही महिला व पुरुष आले आणि त्यांनी पथकावर हल्ला केला.

तलाठी गणेश सदाशिव मोळके यांचेवर लोखंडी राडने जिवघेणा वार केल्यामुळे डोक्यात जब्बर मार लागल्याने गंभीर जख्मी झाले.त्यांना जमावातुन सोडविण्यासाठी गेलेल्या ईतर कर्मचाऱ्यावर जमावाने मोर्चा वळवीला यात वाहान चालक महादेव आडे,संजय नरवाडे यांना सुध्दा जब्बर मार लागला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तलाठी गणेश मोळके यांचे जवळ सर्व कर्मचारी जमले असल्याचा फायदा घेत जमावाने वाहानाची बॅटरी घेऊन धुम ठोकली.
गंभीर जख्मी तलाठी गणेश मोळके यांना ग्रामीण रुग्णालय सवना येथे दाखल केले असता अती रक्तस्त्रावामुळे प्रकृती गंभीर होत चालल्याने अत्यावश्यक उपचारासाठी त्यांना यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे. मंडळ अधिकारी संजय नरवाडे यांचे फिर्यादी वरून महागांव पोलीसात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे.
या जीवघेण्या घटनेमुळे गौण खनिज पथकात दशहत निर्माण झाली असुन कर्मचाऱ्यांच्या जिवन मरणाचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याने विदर्भ मंडळ अधिकारी संघाने गौण खनिज तस्करी रोखण्यासाठी ठोस उपाय केल्याशिवाय काम करणार नाही. तात्काळ या घटनेतील आरोपींना अटक करुन त्यांचे वर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करावी या विषयी काल प्रत्यक्ष जिल्हाधिकारी यांना व आज जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांना निवेदन दिले.
गौण खनिज तस्करी रोखणे हे जिल्हाधकाऱ्यांपासुन कोतवालापर्यंत सर्वांची जबाबदारी असताना मंडळ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत केवळ मंडळ अधिकाऱ्यांनाच गौण खनिज तस्करीला जबाबदार धरण्यात आले आहे.त्यामुळे मंडळ अधिकाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले.
यापुढे गौण खनिज तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी नेमण्यात आलेल्या पथकामध्ये तहसिलदार,नायब तहसीलदार,दोन सशस्त्र पोलिस,शासकीय वाहन असल्याशिवाय कोणताही मंडळ अधिकारी काम करणार नसल्याचा इशारा विदर्भ मंडळ अधिकारी संघाचे जिल्हा अध्यक्ष गजानन सुरोशे,सचिव दिवाकर मनवर,जयानंद ईसाळकर,मनोज गायकवाड यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे ईशारा दिला आहे.



