शहर

रुपेश जाधव क्रांतीसुर्य आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित

भोर प्रतिनिधी दत्तात्रय बांदल

आपल्या निर्भिड व अभ्यासू लिखाणाच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधून जनसामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न करणारे नवराष्ट्र या दैनिक वृत्तपत्राचे पत्रकार रुपेश जाधव यांना क्रांतिसूर्य सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने “क्रांतिसूर्य आदर्श पत्रकार २०२३” हा राज्यस्तरीय पुरस्कार सन्मानित करण्यात आला.

सोमवारी (दि.२०) संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाबा सावंत, सी.आर. ग्रूप संस्थापक अध्यक्ष ॲड हेमचंद्र मोरे, डीवायएसपी बारामती गणेश इंगळे, प्रदेश अध्यक्ष माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण महासंघ सलीमभैय्या शेख, प्रा.डॉ अरुण कांबळे, भीमा कोरेगाव लढाईतील सरसेनापती सिदनाक महार यांचे १३ वे वंशज राहुलजी इनामदार सिने अभिनेता बाबा गायकवाड, वेब सिरीज प्रसिध्द कलाकार छोटू दादा यांच्या हस्ते रत्नपूरी वालचंदनगर इंदापूर येथे हा सोहळा पार पडला.

सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून रुपेश जाधव यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल भोर तालुक्यातील विविध स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button