लवंग येथील फिनिक्स इंग्लिश स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिवस मोठ्या उत्साहात साजरा.

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
लवंग (२५/४) येथील फिनिक्स इंग्लिश स्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्यदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी देभभक्ती गीत गाऊन व देशभक्ती गाण्यावर नृत्य करून उपस्थित ग्रामस्थांना व पालकांना मंत्रमुग्ध केले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय सैन्यदलात राहुन २१ वर्षे देशसेवेसाठी आपले जीवन अर्पण केलेले माजी सैनिक सिकंदर हुसेन शेख (गणेशगांव) यांच्या शुभहस्ते ध्वजाचे पूजा करून ध्वजवदंन केले.तिरंग्यास सलामी दिल्यांनतर शाळेतील चिमुकल्यानी ऐ मेरे वतन के लोगो,आय लव्ह माय इंडिया,हम बच्चे हिंदुस्थान के या देशभक्तीपर गीतांवर बहारदार नृत्य सादर केली आणि इंग्लिश भाषेतून देशभक्ती विषयींचा आदर व्यक्त करीत गावाकऱ्यांना स्वतंत्र्याच्या शुभेच्छा देत भाषणे करीत उपस्तिथांची मने जिंकली

युवा पर्व लवंग यांच्यामर्फत लवंग परिसरातील शाळांमधील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या.या प्रसंगी बोलताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सिकंदर हुसेन शेख म्हणाले आम्ही दहावीत गेलो तरी आम्हाला इंग्रजी वाचयला व लिहायला आणी बोलता तर येत नव्हते . त्या काळात शिक्षणाविषयी पालकांमध्ये जागरूकता नव्हती परंतु आजच्या स्पर्धेच्या युगात पालक आपल्या पाल्याच्या शिक्षणाच्या प्रगती विषयी जागरूक झालेले पहायला दिसत आहेत.या शाळेतील केवळ तीन,चार ,पाच वर्षांची मुले उत्तम इंग्लिश बोलत आहेत.स्पर्धेच्या युगात आपली मुले टिकून राहण्यासाठी इंग्रजी भाषा आत्मसात करणे अवश्यक आहे.
यावेळी शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष समाधान जगताप,उपाध्यक्ष दशरथ दगडे,असलम काझी,सोमनाथ राऊत ,विकास चव्हाण,रेवन भोळे,भीमराव शिंदे,भारत सरवदे,निलेश वाघ,रेडे पाटील,चैतन्य मेडिकल यांनी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केला.
हा कर्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या संचालिका नूरजहाँ फकृद्दीन शेख,गुलशन नशीब शेख,रुबीना नौशाद शेख, मोईन फकृद्दीन शेख,महादेव कोळेकर रमेश गायकवाड यांनी परिश्रम घेतले.



