महाराष्ट्र

सवतगव्हाण गावाच्या उपसरपंच पदी यशराज निंबाळकर यांची बिनविरोध निवड

प्रतिनिधी… रियाज मुलाणी टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो 9921500780

खरेदी विक्री संघाचे चेअरमन सवतगव्हाण गावचे नेते नितीनराजे निंबाळकर यांचे चिरंजीव यशराज नितीनराजे निंबाळकर यांची सवतगव्हाण ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी डोके यांच्या उपस्थितीत निवडीची प्रक्रिया पार पडली यावेळी यशराज निंबाळकर यांचे नाव सर्वानुमते पुढे आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये निंबाळकर गटाने सरपंच पदासह 9 पैकी 8 जागा जिंकत सवतगव्हाण ग्रामपंचायतीवर झेंडा फडकविला

याप्रसंगी नूतन सरपंच रिना जिवन पवार,सदस्य करण इनामके , गजाननराव निंबाळकर, राणी जाधव, किरण काळे, राणी खरे, रोहिणी बोरावके, जयश्री देखणे,आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button