विशेष
राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांची जयंती अकलूज मध्ये मोठ्या उत्साहात साजरी

प्रतिनिधी… रियाज मुलाणी
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
मो.99 21 500 750
अज्ञान, अस्वच्छता, अंधश्रद्धा, यांनी बुरसटलेल्या समाजाचा विकास करण्याचे व्रत हाती घेऊन कीर्तनासारखे प्रभावी माध्यम वापरून समाज सुधारण्याचे कार्य करणारे राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांची जयंती माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे दि.24 फेब्रुवारी रोजी समाज बांधवांच्या वतीने साजरी करण्यात आली.

यावेळी राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन दत्तात्रय भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच परीट समाजाचे नेते शांतीलाल कारंडे व ॲड प्रवीण कारंडे, यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले, यावेळी प्रमुख उपस्थिती शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख संतोषभैया राऊत, शहराध्यक्ष सारंग मोरे, नितीन भोसले, शेखर भोसले, अमर भोसले, संकेत भोसले, बाबासाहेब कारंडे, समाजबांधव उपस्थित होते.



