महाराष्ट्र

लोकशाहीर,साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या आज 56 व्या पुण्यतिथी यानिमित्ताने…

टाईम्स 9 मराठी :प्रतिनिधी महेश मोहिते मो.8380848673

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या56 व्या पुण्यतिथी यानिमित्ताने पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे क्रांतिकारक अनमोल विचार…

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते.अण्णा भाऊ साठे यांची ओळख संपूर्ण देशात एका लोकशाहीर म्हणून आहे. विशेषतः दलित, वंचित, शोषित यांच्या मध्ये त्यांची प्रतिमा एका लोकप्रिय जनकवीची आहे. आपल्या लेखनातून त्यांनी हाशियावरील समाजाला आक्रमक भाषा दिली. जनचेतना निर्माण केली. लोकांना आपल्या हक्कांसाठी जागरूक केलं. झोपलेल्या समाजात सामाजिक क्रांतीचा अलख जागवला. देशाचा स्वातंत्र्यलढा, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन आणि गोवा मुक्ती आंदोलन या सर्वच चळवळींमध्ये अण्णा भाऊ साठे यांचा सक्रिय सहभाग होता.
देशवासीयांच्या हक्कांसाठी आणि न्यायासाठी एका कलाकाराच्या भूमिकेतून ते प्रत्येक आंदोलनात नेहमी पुढे होते. त्यांच्या लिहलेले पोवड्या, लावण्या या मुक्ती चळवळींमध्ये नवी ऊर्जा आणि जोश निर्माण करत असत.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या आज 56 व्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करण्यासाठी यावेळी उपस्थित मान्यवर समस्त मातंग समाज नातेपुते. भूमिहीन शेतकरी कामगार संघटना नातेपुते .विनोद भैय्या लांडगे युवा मंच नातेपुते . माजी उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख .पंचायत समिती सदस्य माऊली पाटील .नगरसेवक रणजीत पांढरे .नगरसेवक अण्णासाहेब पांढरे. नगरसेवक रणवीर देशमुख .भूमिहीन शेतकरी कामगार संघटना संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष माऊली भाऊ खिलारे. पैलवान विनोद भैय्या लांडगे .पैलवान संग्राम जठार .सतीश दनाने. माळशिरस कार्याध्यक्ष रामचंद्र रणदिवे .उपाध्यक्ष अक्षय देवकुळे. संतोष लांडगे .योगेश लांडगे .साईराज सपकाळ. विशाल खुडे. रंजीत मुळेकर. साहेबा सकट .अक्षय लांडगे. अरबाज मुलानी. शिवा लांडगे. राजेंद्र बोराटे .समाधान सकट. रोहित लांडगे. विजय बाबा लांडगे .सोन्या लांडगे. ओम लांडगे. विश्वास लांडगे. यश लांडगे .प्रणव सकट .समर्थ लांडगे .सलीम शेख .सचिन काळे .शिवप्रसाद लांडगे .गणेश लांडगे .सचिन रणदिवे‌. अमर जाधव. किरण लांडगे. इत्यादी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button