क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार पोथरे येथील शिक्षिका श्रीमती शगुप्ता हुंडेकरी (शेख) यांना प्रदान.पुणे येथे झाला एका शाही सोहळा कार्यक्रमात पुरस्कार वितरण संपन्न
करमाळा प्रतिनिधी अलीम शेख
मोबाईल नंबर 98 50 68 63 60
परिवर्तन सामाजिक संस्थेतर्फे दरवर्षी देण्यात येणारा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार पोथरे शाळेच्या आदर्श आणि उपक्रमशील शिक्षिका श्रीम. शगुफ्ता हुंडेकरी (शेख) यांना प्रसिद्ध सिने -अभिनेते किरण माने यांच्या हस्ते सन्मानपूर्वक आज प्रदान करण्यात आला.
हा सोहळा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह, पुणे येथे मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी इतिहास संशोधक व प्रसिद्ध शिवव्याख्याते श्री . श्रीमंत कोकाटे सर , समाजकल्याण चे सहा. आयुक्त श्री .विशाल लोंढे , महाराष्ट्र टाईम्स व बीबीसी दिल्ली मराठी विभागाचे प्रमुख श्री. अभिजीत कांबळे , साहित्यक तथा कार्यक्रमाचे आयोजक श्री. जगदीश ओहोळ हे मान्यवर उपस्थित होते .
सौ. शगुफ्ता शेख या एक उपक्रमशील शिक्षिका असून त्या एक संवेदनशील लेखिका व उत्कृष्ट कवयित्री देखील आहेत. आपल्या सेवेच्या माध्यमातून केवळ शैक्षणिक विकास न साधता विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधून अष्टपैलू विद्यार्थी घडवून माझे विद्यार्थी तथा देशाची भावी पिढी एक आदर्श नागरिक बनेल यादृष्टीने त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो .
हा उल्लेखनीय राज्यस्तरिय पुरस्कार मिळाल्याबद्दल करमाळा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. राजकुमार पाटील साहेब, गटविकास अधिकारी श्री. मनोज राऊत साहेब, विस्तार अधिकारी श्री. सुग्रीव नीळ साहेब व जयवंत नलवडे साहेब , केंद्रप्रमुख श्री. निशांत खारगे सर, मुख्याध्यापक श्री. गजेंद्र गुरव सर, सर्व शिक्षकवृंद तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. संतोष साळुंके , सर्व सदस्य, ग्रामस्थ व पालकवर्ग यांनी विशेष अभिनंदन केले आहे .