मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी घेतली मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट
करमाळा प्रतिनिधी
मराठा आरक्षण संघर्षयोद्धा श्री मनोज ( दादा ) जरांगे – पाटील यांची आज सकाळी मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख, आरोग्यदूत व करमाळा येथील रहिवासी असलेली मंगेश चिवटे यांनी अंतरवली येथे भेट घेतली. श्री मनोज दादा यांच्या तब्बेतीची प्रथम आस्थेवाईकपणे चौकशी केली. त्यांच्यावर उपचार करणारे गॅलकसी हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ चावरे सर , डॉ तारख सर, श्री मनोज दादा यांचे सहकारी अंतरवली सरपंच श्री पांडुरंग तारख , श्री संजय कटारे, श्री दत्ता घोडके यांच्या सहित सर्व सहकारी उपस्थित होते. श्री मनोज दादा यांनी अत्यावश्यक उपचार घेण्यास तयारी दर्शविल्याने त्यांचे राज्यातील सर्व जनतेच्या वतीने मनःपूर्वक आभार मानले. आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आलेली असताना आपली तब्बेत जपणे अतिशय महत्वाचे असल्याची विनंती त्यांना केली. अत्यावश्यक उपचार घेतल्याने श्री मनोज दादा यांची तब्बेत आज ठीक होती. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली.श्री मनोज दादा यांनी सांगितलेल्या मुद्द्यांवर सातत्याने पाठपुरावा करत होतो आणि यापुढेही करत राहणार असल्याची ग्वाही यावेळी त्यांना दिली. राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब अतिशय संवेदनशीलपणे हा विषय हाताळत असून येत्या २० तारखेला मराठा आरक्षण विषयावर विशेष अधिवेशन होत असल्याची माहीतीही यावेळी त्यांना दिली.