निमगाव केतकीत मटका अड्ड्यावर इंदापूर पोलीसांची कारवाई, रोख रकमेसह ६३ हजार ९८० रूपयांचा मुद्देमाल जप्त. मटका चालकासह अकरा जणांवर कारवाई.

इंदापूर प्रतिनिधी एस. बी. तांबोळी,
मोबाईल – 8378081147
इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे खुलेआम – चालू असणा-या मटका अड्ड्यावर पोलिसांनी धडक कारवाई केली. कारवाईत निमगावच्या मटका चालकासह ११ जणांवर कारवाई केली. यामध्ये रोख रकमेसह ६३ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
इंदापूर पोलिसांनी मटक्याच्या धंद्यावरील कारवाई मंगळवारी (दि. १४ मार्च) रोजी सायंकाळी ५ वा. ४० वाजण्याच्या सुमारास निमगाव केतकी हद्दीत डोंगरे कॉम्प्लेक्स समोर जालींदर गेणा बारवकर यांचे पत्रा शेडच्या आडोशाला केली. सदर प्रकरणी हवालदार वैभव साळवे यांनी फिर्याद दिली आहे. यामध्ये मटका मालक शंकर भिमराव भोंग (रा. निमगाव केतकी ता.इंदापूर) यांचेसह चार बुकी एजंट व सहा मटका खेळणारे अशा ११ जणांवर कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी ( दि. १४ रोजी ) मटका मालक शंकर भोंग यांच्या सांगणेवरून नारायण गोपाळ बनकर (वय ४३ वर्ष ), रणजित लक्ष्मण भोंग (वय ३८ वर्ष), रामदास विठठल भोंग (वय ४८ वर्ष ) तिघेही रा. निमगाव केतकी ता. इंदापूर, कालीदास दत्तात्रय माने (वय ५४ ) रा. शेळगाव ता इंदापूर जि. पुणे हे कल्याण जुगार नावाचा मटका खेळत होते.
कल्याण मटका खेळत असताना हनुमंत प्रल्हाद बारवकर ( रा. बारवकर वस्ती, निमगाव केतकी ता इंदापूर जि. पुणे), विलास भानुदास ढावरे (वय ६३ रा. वरकुटे खुर्द ), मोहन रामचंद्र राउत (वय ४५ वर्ष रा. भैरोबाचा मळा, निमगाव केतकी), पांडुरंग गेणबा बरळ (वय ६५ रा. व्याहळी), गणपत भानुदास कुंभार (वय ५९ रा.कुंभार वस्ती, पिटकेश्वर ता इंदापूर), रामदास अर्जुन भोंग (वय ५० वर्ष रा.गोतोंडी) आदींवर इंदापुर पोलीस स्टेशन गु.र.नं. ३३१ / २०२३ मुंबई जुगार कायदा कलम १२ अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरील छाप्यात २१ हजार १८० रुपयांची रोख रक्कम, तसेच टेबल, प्लॅस्टीक खुर्चीसह इतर साहित्य असे एक हजारांचे सामान, तसेच २० हजार रुपये किमतीची पांढ-या रंगाची गाडी ( एम एच ४२ ए व्ही १०८८ ), तसेच जप्त करण्यात आलेले मोबाईल त्याची २१ हजार ८०० रुपयांची किंमत असा एकूण ६३ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहेत.



