नवीन पोलीस स्टेशन व प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे व आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते संपन्न

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी, मोबाईल 8378076123
येथील तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत बांधण्यात आलेल्या १ कोटी ३३ लाख रूपयांच्या पोलीस स्टेशन इमारतीचे व १ कोटी ३२ लाख रूपयांच्या प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे उदघाटन महासंसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते व माजी राज्यमंत्री, आमदार दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.

नीरा नरसिंहपूर येथील पोलीस स्टेशनची सुसज्ज इमारत व नागरिकांच्या आरोग्यासाठीचे महत्वाचे प्राथमिक आरोग्य केंद्र नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. महासंसदरत्न खासदार सुप्रिया सुळे व माजी राज्यमंत्री, आमदार दत्तात्रय भरणे यांनी भक्तनिवास मध्ये नागरिकांशी संवाद साधत तिर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांची पहाणी व चर्चा केली. यावेळी प्रशांत पाटील, प्रताप पाटील, हनुमंत कोकाटे, श्रीमंत ढोले, सचिन सपकळ, सुरेश शिंदे, संग्रामसिंह पाटील, सागर मिसाळ, श्रीकांत बोडके, दादासाहेब क्षिरसागर, गौरव दंडवते, सरपंच अश्विनी सरवदे, उपसरपंच रेणूका काकडे, अर्चना सरवदे, शंकर राऊत आदि परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते.

तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत बांधण्यात आलेल्या १ कोटी ३३ लाख रूपयांच्या पोलीस स्टेशन इमारतीचे व १ कोटी ३२ लाख रूपयांच्या प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे काम एक वर्षापूर्वी पुर्ण करण्यात आले आहे. इमारत मागील एक वर्षापासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत धुळखात पडून होती. राज्य शासनाने नुकतेच पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावांची नावे राज्यशासनाच्या परीपत्रकात प्रसिद्ध केले आहेत. त्यामुळे येथील पोलीस स्टेशनचे कामकाज लवकरच सुरू होण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.




