मराठा समाजाला आरक्षण द्यावे शिवसेनेची मागणीशिवसेनेचे उपनेते आनंदराव जाधव

करमाळा प्रतिनिधी आलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे खास विश्वासू माननीय पांडुरंग पाटील यांना मराठा आरक्षण तात्काळ द्यावी या मागणीची निवेदन देण्यात आले.जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या कार्यालयात शिवसैनिकांची बैठक झाली
त्यातील प्रत्येक शिवसैनिकांनी मराठा आरक्षण तात्काळ द्यावी अशी मागणी उपस्थितांकडे केली बोलताना पांडुरंग पाटील म्हणाले की राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देणे ही काळाची गरज असून संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जीवाची बाजी लावून हे आरक्षण देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची शपथ घेऊन एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची आश्वासन दिले आहे.यामुळे मराठा आरक्षण देण्यासंदर्भात शिवसेनेची सकारात्मक भूमिका असून या करमाळा तालुक्यातील शिवसैनिकांच्या भावना एकनाथ शिंदे साहेबांकडे पोहोचू असे सांगितले
यावेळी बोलताना शिवसेना उपनेते आनंदराव जाधव म्हणाले की करमाळा तालुक्यातील येणाऱ्या काळात एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वाखालील शिवसेनेचा आमदार निवडून आला पाहिजे यासाठी सर्वांनी एक होऊन कामाला लावावे.प्रमुख महेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली गाव तेथे शाखा शिवसेना मजबूत करावी
केवळ नावासाठी व प्रतिष्ठेसाठी शिवसेनेचे पद घेऊ नये प्रत्येकाने काम करून आपला अहवाल पक्षाकडे सादर करावा पदाधिकारी समाधानकारक काम करणार नाहीत पक्ष संघटना खडक धोरण अवलंबले असल्याचे सांगितले



