महाराष्ट्र

अकलुज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहमेळावा आणि सेवापूर्ती सोहळा संपन्न

उपसंपादक—— हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448

अकलूज येथील शंकराव मोहिते महाविद्यालयात मंगळवार दि.३०/०५/२०२३ रोजी वनस्पतीशास्त्र विभाग व ॲग्रो केमिकल्स अँड पेस्ट मॅनेजमेंट विभागप्रमुख प्रा. रामलिंग सावळजकर आणि डॉ. सुभाष शिंदे यांचा सेवापूर्ती समारंभ आजी-माजी विद्यार्थी व विभागातील सहकाऱ्यांच्या वतीने आयोजित करण्यात आला.

या सोहळ्यास वनस्पतीशास्त्र व ए.जी.पी.एम विभागातील सण १९८८ ते २०२३ या काळातील सुमारे १२५ माजी विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षप्रमुख डॉ.एच.के.आवताडे व अध्यक्ष प्राचार्य डॉ.डी.एस.बागडे यांच्या हस्ते प्रा.रामलिंग सावळकर यांचा बुके, शाल-श्रीफळ व विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकामध्ये माजी विद्यार्थी प्रकाश धाईंजे यांनी महाविद्यालय व वनस्पतीशास्त्र विभागाचा १९८८ पासून ते आत्तापर्यंतच्या उन्नतीचा आढावा घेतला.

यावेळी प्राचार्य डॉ.बागडे यांनी प्रा.सावळजकर यांच्या संपूर्ण सेवाकाळातील शैक्षणिक व सामाजिक योगदानाबद्दल कौतुक केले. सोहळ्यामध्ये माजी विद्यार्थी प्राचार्य डॉ.बापू चौगुले, प्रा.भारत वाघ, सुभाष रणदिवे, प्रकाश माने, अश्विनी हेगडे, अजित भोपळे, ओंकार जोशी, संदीप पाटील तसेच आजी विद्यार्थी शुभम मोहिते, शिवनिंगप्पा हारकुड, करण अहेर, तृप्ती शिंदे, अनंत साठे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून प्रा.सावळजकर यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

तद्नंतर प्रयोगशाळा परिचर मारुती गायकवाड यांनी प्रा.सावळजकर यांच्याविषयी कविता सादर करून सर्वांचे मन भारावून टाकले. कार्यक्रमात पुढे आजी-माजी विद्यार्थ्यांनी सावळजकर सरांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. कार्यक्रमास माजी विद्यार्थी जयराज माने-पाटील, प्रा.सचिन माळी तसेच महाविद्यालयातील सहकारी प्राध्यापक डॉ.टिळेकर सर, डॉ.पवार सर, डॉ.देवकर सर, डॉ. बनसोडे मॅडम, पी.एस.आय. संदीप फुदे, कार्यालयीन अध्यक्ष युवराज मालुसरे उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.सविता सातपुते, प्रा.प्रमोद घोगरे, प्रा. रोहित कुंभार, प्रा. प्रतिभा नलवडे, प्रा. स्नेहल पांढरे, प्रा. ज्योती फुले, प्रा. अस्मिता माने, प्रा. विक्रम कुंभार, प्रा.दत्ता शिंदे, प्रा.आप्पासाहेब व्यवहारे, श्री.बापू कदम, श्री.महेंद्र साठे इत्यादींनी परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राणी पवार यांनी केले तर प्रा.विनायक भगत यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button