पालघर पोलीस ठाणे हद्दीतील दांडेकर कॉलेजमध्ये शिकणारी (21) वर्षीय तरुणी बेपत्ता…
टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
पालघर जिल्हा प्रतिनिधी
विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक- 7030516640
पालघर पोलीस ठाणे हद्दीतील दांडेकर कॉलेजमध्ये शिकणारी (21) वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्या प्रकरणी या मुलीच्या वडिलांनी पालघर पोलीस ठाण्यात मंगळवारी मिसिंग तक्रार दाखल केली आहे.
शिवम अपार्टमेंट सुंदरम शाळेजवळ वाघुळसार माहीम रोड पालघर येथे राहणारी (21) वर्षीय तरुणी कुमारी सीता रामसागर गौतम ही सोमवार दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 7.15 वाजता पालघर येथील दांडेकर कॉलेजमध्ये गेली होती.ती दुपारी कॉलेज सुटल्यावर घरी परतलीच नाही म्हणून तिचे वडील रामसागर गौतम व तिच्या कुटुंबीयांनी तिचा आसपासच्या परिसरात व कॉलेजच्या परिसरात शोध घेतला असता ती सापडली नाही
तसेच तिचा भ्रमणध्वनी क्रमांक ही बंद येत असल्या कारणामुळे तिच्या वडिलांनी मंगळवार दिनांक 6 फेब्रुवारी 2024 रोजी पालघर पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल केली आहे. या मुलीने अंगात केसरी कलरचा कुर्ता आणि फिकट निल्या रंगाची जीन्स पॅन्ट, पायात बूट, कानात सोन्याच्या रिंगा, नाकात सोन्याची चमकी, व तिच्यासोबत निळ्या रंगाची बॅग तसेच ती हिंदी मराठी भोजपुरी भाषा बोलणारी आहे. तिच्याजवळ किमती विवो कंपनीचा मोबाईल आहे.तिची उंची 5 फूट 4 इंच,रंग सावळा, बांधा- सडपातळ,गोल चेहरा, सरळ-नाक अशा वर्णनाची मुलगी नागरिकांना दिसून आल्यास अगर मिळून आल्यास पालघर पोलीस ठाणे पोलीस हवालदार रवींद्र गोरे यांच्याशी 7020461200 8669604032, 8669604033 या भ्रमणध्वनी क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा असे आवाहन पालघर पोलीस ठाणे यांच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.