कुटीर रुग्णालय बदली करून छत्रपती शिवाजी महाराज उपजिल्हा रुग्णालय करमाळा नाव करावे. जिल्हा अध्यक्ष :- साहेबराव वाघमारे
करमाळा प्रतिनिधी
अलीम शेख
मोबाईल नंबर 98 50 68 63 60
करमाळा तालुका उपजिल्हा रुग्णालय असून सदर रुग्णालया मध्ये तालुक्यातील तसेच आजुबाजुच्या काही तालुक्यातील लोक उपचाराकरिता येत असतात. या रुग्णालयास कुटीर रुग्णालय करमाळा असे संबोधिले जाते. तरी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी येत असून सदर जयंती निमित्त व करमाळा तसेच
आजुबाजूच्या तालुक्यातील तमाम शिवप्रेमी आंबेडकर प्रेमी वंचित बहुजन युवा आघाडी यांची मागणीनुसार सदर रुग्णालयाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज उपजिल्हा रुग्णालय असे नामकरण करण्यात यावे. सदर नामकरण हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त दि.19 फेब्रुवारी रोजी च्या आत करण्याचे करावे. या विनंती वजा मागणीला आपणाकडून मान्यता मिळेल व करमाळा शहरातील उपजिल्हा रुग्णालयाचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज उपजिल्हा रुग्णालय होईल अशी आशा आहे. तरी आपणांस पुन: श्च एकदा विनंती की आपण आपल्या स्तरावरुन नामकरण प्रक्रिया करावी व उपजिल्हा रुग्णालयाचे नामकरण करुन द्यावे जेणेकरुन छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव व इतिहास जनमाणसांत रुजू होईल. असे निवेदनात नमूद केले आहे.
निवेदन करमाळा नायब तहसीलदार. काझी भाऊसाहेब यांनी स्विकारले. यावेळी. दत्त कला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष. रामदास झोळ.मराठा महासंघाचे ता.अध्यक्ष. सचिन काळे. रा. कोन्ग्रेस चे हणमंत मांढरे. शहर अध्यक्ष. गणेश कांबळे. महासचिव रामभाऊ कांबळे. उपाध्यक्ष. साधू चौथमहाल. ता.संघटक. महावीर पोळ, श्री कमला देवी माळ. राजेंद्र फलफले . चव्हाण. अरुण जैन सिद्धांत वाघमारे. विनोद कुकडे. सूरज कांबळे. आदींनी निवेदनावर सह्या केल्या. पुढे बोलताना जिल्हा अध्यक्ष ÷साहेबराव वाघमारे यांनी सांगितले की जर कुटीर चे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज उपजिल्हा रुग्णालय नाव न केल्यास वंचित बहुजन युवा आघाडी च्या वतीने 15 फेब्रुवारी रोजी आंदोलन केले जाईल. असा इशारा देण्यात आला.