देश-विदेश

टाटा पॉवर कंपनीच्या धरणातून उजनी धरणात पाच टी एम सी पाणी सोडा :- मा.आ. नारायण पाटील यांची मुख्यमंत्री शिंदे यांचेकडे मागणी

करमाळा प्रतिनिधी

अलीम शेख

मोबाईल नंबर 98 50 68 63 60

टाटा पॉवर कंपनीच्या धरणांमधून उजनी धरणात पाच टी एम सी पाणी सोडण्याबाबत माजी आमदार नारायण पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे घातले असून एका लेखी निवेदनाद्वारे त्यांनी ही मागणी केली आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की दहा वर्षानंतर उजनी धरणातील पाणीसाठा हा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच मायनस मध्ये गेला आहे.यात उजनी धरणातील गाळ विचारात घेतल्यास जानेवारी ते जून अखेर म्हणजेच अगदी सहा महिने सध्या राखीव असलेले पाणी पुरणार नाही. टाटा पॉवर कंपनीच्या भीमा नदीचे पाणी अडवून वापरत असलेल्या पाच धरणात सध्या उपयुक्त पाणी साठा असून तो केवळ वीज निर्मितीसाठी वापरला जात आहे. शिवाय त्यांचे या पणीसाठ्यावर किमान दोन वर्षाचे नियोजन असते.यामुळे सहा महिन्यानंतर पाऊस पडणार असेल तर टाटा पॉवर कंपनीच्या नियोजनावर सध्या उजनी धरणात पाच टी एम सी पाणी सोडल्यास फारसा फरक पडणार नाही. शिवाय टाटा पॉवर कंपनीच्या या धरणाची समुद्र सपाटी पासुंची उंची ही उजनी धर्मापेक्षा 100 मी हून अधिक असल्याने या पाच धरणातून पाणी सोडल्यास नैसर्गीक पद्धतीने ते अधिक वेगाने उजनीत येऊन पोहचणार आहे. उजनीवर पुणे, सोलापूर या दोन जिल्ह्यातील शेती, उद्योग याबरोबरच नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी योजना कार्यान्वित असल्याने महाराष्ट्र शासन वरील निर्णय घेऊ शकत आहे. मुळशी परिसरातील ५० गावातील पिण्याच्या पाण्यासाठी टाटा पॉवर कंपनीच्या धरणातून पाणी देण्यात यावे या मागणीसाठी नागरिकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्याची सुनावणी ९ फेब्रुवारी २०२४ रोजी होणार असल्याने शासनाने याच धर्तीवर सकारात्मक होऊन उजनी धरण परिसरातील दोन जिल्ह्यांचा विचार केल्यास आणि टाटा पॉवर कंपनीच्या पाण्यातून उजनीत पाणी मागणी केल्यास संभावित पाणी टंचाईचे संकट दूर होणे शक्य आहे. तरी आपल्या नेतृत्वाखालील कॅबिनेट बैठकीत याविषयावर चर्चा होऊन महाराष्ट्र शासनाने टाटा पॉवर कंपनीच्या धरणातील पाच टी एम सी पाणी उजनीत सोडण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी माजी आमदार नारायण पाटील यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button