पालघर जिल्ह्यातील सफाळे पोलीस ठाणे इन्चार्ज पदी पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे यांची नव्याने नियुक्ती.

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक- 7030516640.
पालघर जिल्हा वृत्तांत.
पालघर जिल्ह्यातील सफाळे पोलीस ठाणे इन्चार्ज पदी पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे यांची बुधवार दिनांक 2 ऑगस्ट 2023 पासून नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी वरिष्ठांच्या आदेशान्वये केली असून याआधी सफाळे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी यांची तडकाफडकी मंगळवार दिनांक 1 ऑगस्ट 2023 पासून पालघर कंट्रोल कक्ष येथे बदली केली आहे.
पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे 2005 रोजी महाराष्ट्र पोलीस खात्यात रुजू झाले असून 2005 ते 2009 या कालावधीत ते ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात कार्यरत होते. यानंतर 2009 ते 2013 मध्ये डी.बी.मार्ग पोलीस ठाण्यात ते डिटेक्शन अधिकारी म्हणून कार्यरत होते.तर 2013 ते 2017 मध्ये मुंबई विशेष शाखा व अर्बन नक्षल शाखेमध्ये कार्यरत असताना आपले कर्तव्य बजावत असताना परराज्यातून 5 आरोपींना अटक केल्याबद्दल त्यांचा मुंबई पोलीस आयुक्तांकडून प्रशंसापत्र देऊन सन्मान करण्यात आला होता.
सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असताना कर्तव्यदक्ष जबाबदारी आणि कामाची पद्धत उल्लेखनीय कामगिरी आणि अनुभव असल्यामुळे त्यांची 2017 रोजी पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली या पदावर विराजमान असताना ते आरसीएफ मध्ये कार्यरत होते. तसेच त्यांनी विठ्ठलभाई पटेल रोड पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून आपली जबाबदारी उत्कृष्टरित्या पार पाडली आहे.
त्यानंतर त्यांची बदली पालघर जिल्ह्यातील पालघर सुरक्षा शाखेमध्ये करण्यात आली होती. बुधवार दिनांक 2 ऑगस्ट 2023 रोजी पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे यांची नियुक्ती सफाळे पोलीस ठाण्यात केली असून पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे यांनी बुधवार दिनांक 2 ऑगस्ट 2023 रोजी सफाळे पोलीस ठाण्याचा चार्ज हाती घेतला आहे.



