महाराष्ट्र

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त निःस्वार्थ सेवा युथ फाउंडेशन मार्फत भोर तालुक्यामध्ये रुक्षारोपण कार्यक्रम

भोर प्रतिनिधी दत्तात्रय बांदल

भोर तालुक्यामध्ये वेळवंड गावामध्ये निस्वार्थ सेवा युथ फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत पर्यावरण दिनानिमित्त वृक्षरोपण कार्यक्रम राबवण्यात आला. वेळवंड गावातील शासकीय रुग्णालयाच्या प्रांगणात हा कार्यक्रम संपन्न झाला ..

कार्यक्रमाला भोरचे पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे, भोर वन विभागातील वनपाल विद्या गेंगने, वनरक्षक शांता बगाडे, आम्ही भोरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष समीर घोडेकर, वेळवंड गावचे सरपंच मा. सौ. काजल पांगुळ, सह्याद्री रेस्क्यु फोर्स चे आध्यक्ष सचिन देशमुख उपसरपंच अनिल दिघे , सामाजिक कार्यकर्ते अंकुश भोसले, गणेश पांगुळ, दत्तात्रय बैलकर, सुरेश बोडके, शिवाजी मोरे, ग्रामसेवक स्वाती धुमाळ, सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव पडवळ आदी उपस्थित होते ..

या कार्यक्रमा अंतर्गत जांभूळ, सीताफळ, पेरू, वड, पिंपळ तसेच लक्ष्मी तरू या झाडांची लागवड करण्यात आली व रोपांचे वाटप करण्यात आले . एकूण ७०० रोपांचे वाटप व लागवड या कार्यक्रमा अंतर्गत करण्यात आली. यावेळी वेळवंड तसेच वेळवंड खोऱ्यातील ४०० हून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते ..

आज तुम्ही झाडे वाचवा ही झाडे तुमची पुढील कित्येक पिढ्या वाचवतील असा संदेश निस्वार्थ सेवा युथ चे अध्यक्ष रोहन अंकुश भोसले यांनी आपल्या भाषणातून ग्रामस्थांना दिला तसेच रूक्षवल्ली आम्हा सोयरे असे सांगत आम्ही भोरकर प्रतिष्ठानचे आध्यक्ष समीर घोडेकर यांनी ग्रामस्थांना झाडांचे महत्त्व पटवून दिले.

सह्याद्री रेस्क्यू फोर्स चे अध्यक्ष सचिन देशमुख यांनी डोंगरात लागणारा वणवा त्यामुळे होणारी पर्यावरणाची हानी याबद्दल मार्गदर्शन केले..

सामाजिक कार्यकर्ते ओंकार सापे , भोर तालुक्यातील
वनपाल विद्या गेंगने यांनी सणांच्या माध्यमातून झाडे माणसाच्या आयुष्याशी कशी जोडली गेली आहेत, झाडे कशी आपल्या सर्वांसाठीच माहत्वाची आहेत , तसेच ओझेन लेयर सारख्या जागतिक पातळीवर महत्वाच्या असणाऱ्या मुद्यांवर बोट ठेवून वृक्ष लागवडी बद्दल जागरूकता निर्माण केली..

पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे यांनी निस्वार्थ सेवा युथच्या कामाचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन थोरात सर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता वेळी गणेश पांगुळ यांनी सर्वांचे आभार मानले…

कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी निस्वार्थ सेवा युथचे आध्यक्ष रोहन अंकुश भोसले व त्यांच्या सोबत ओंकार दानवले, ओंकार सापे , आकाश दानवले, जीवन भोसले , किरण तुपे , राहुल भरगुडे , पोपट थोपटे, यश भोसले, विकास दानवले यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button