अखेर गोंधळी समाजासाठी परमपूज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
गोंधळी समाजाच्या आर्थिक विकासासाठी महत्वपूर्ण पाऊल टाकण्यात आले आहे. परमपूज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापनेचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे, जो संपूर्ण गोंधळी समाजाच्या प्रगतीसाठी एक मोठी संधी ठरणार आहे.महाराष्ट्रातील अकलूज गावातून भव्य मोर्चा काढत सर्व गोंधळी बांधवांनी हा मुद्दा उचलून धरला,आपले हक्क मागण्यासाठी एकत्रित आवाज उठवला आणि अखेर या लढ्याला न्याय मिळाला. हे यश प्रत्येक गोंधळी बांधवाच्या एकजुटीचे प्रतीक आहे.
यासाठी महा युती सरकारचे मनःपूर्वक आभार, ज्यांनी आमच्या समाजाच्या न्याय्य हक्कांना मान्यता देऊन हा महत्वपूर्ण निर्णय घेतला. हा केवळ एक निर्णय नाही, तर सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाच्या दिशेने उचललेले भक्कम पाऊल आहे.आता आपल्याला हा विकास पुढे नेण्यासाठी अधिक कार्य करायचे आहे. संपूर्ण गोंधळी समाजाने शिक्षण, व्यवसाय आणि आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने प्रगती करावी, हीच अपेक्षा.



