शहर

पालघर रेल्वे लोहमार्ग पोलीस निरीक्षक सचिन इंगवले यांनी सफाळे येथील दोन युवकांवर केला विनयभंगाचा गुन्हा दाखल

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640

पश्चिम रेल्वेच्या सफाळे रेल्वे प्लॅटफॉर्म हद्दीत एका युवतीची छेडछाड करणाऱ्या सफाळे येथील दोन युवकांवर पालघर रेल्वे लोहमार्ग पोलीस निरीक्षक सचिन इंगवले यांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून या आरोपींना कोर्टाने तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

या आरोपींवर सक्त कारवाई करण्याची मागणी पालघर जिल्ह्यातील बजरंग दलाने रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
गुरुवार दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी सफाळे येथील एक स्थानिक युवती सफाळे रेल्वे रेल्वे स्थानकात संध्याकाळी 6:00 वाजण्याच्या सुमारास ट्रेन मधून उतरल्यावर या मुलीला बघून छपरी गीरीने सिटी मारून तिची छेड काढून हात पकडल्यावर या मुलीने आरडा ओरड केल्यावर स्थानिक रहिवासी व प्लॅटफॉर्म वरील रेल्वे पोलिसांनी या मुलीची सुटका केली असून याबाबत पालघर लोहमार्ग रेल्वे पोलीस निरीक्षक सचिन इंगवले यांनी रफिक शेख आणि इस्लाम शेख या दोन युवकांना त्वरित अटक करून त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून या दोन्ही आरोपींना कोर्टात हजर केले असता त्यांना कोर्टाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या गुन्ह्यातील आरोपींची सखोल चौकशी करून या आरोपींवर सक्त कारवाई करण्यात यावी अन्यथा आंदोलन केले जाईल अशी मागणी पालघर जिल्ह्यातील बजरंग दलाने रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button