आषाढी वारीनिमीत्त हरीतवारी अभियानांतर्गत सराटी येथे वृक्षारोपण

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी, मोबाईल – 8378076123
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आषाढी वारी २०२३ हरितवारी अभियानांतर्गत सराटी येथे दोनशे वृक्षांची लागवड करण्यात आली.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सराटी येथील मुक्काम आटोपून अकलूज ( ता. माळशिरस ) कडे आज मार्गस्थ झाली. त्यानंतर हरितवारी अभियानांतर्गत सराटी येथे जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल व बारामतीचे प्रांताधिकारी नावडकर साहेब, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, तहसीलदार श्रीकांत पाटील, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, विस्तार अधिकारी युनूस शेख यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
विस्तार अधिकारी युनूस शेख म्हणाले, हरीतवारी अभियानांतर्गत सराटी येथे कडुनिंब, वड, पिंपळ, चिंच आदी २०० वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.
यावेळी उपसरपंच संतोष कोकाटे, माजी सरपंच रमेश कोकाटे, बाबासाहेब कोकाटे, मनोज जगदाळे, अमर जगदाळे, वैभव कोकाटे, ग्रामसेवक गणेश लंबाते, अर्जून साळुंखे, हनुमंत पाटील, सागर सवासे यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.




