डहाणू येथील एका (75) वर्षीय वृद्ध आदिवासी महिलेची लोकप्रतिनिधी कडून फसवणूक

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640
पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुका येथील एका 75 वर्षीय वृद्ध आदिवासी महिलेची लाखो रुपयांची फसवणूक करून तिला जीवेठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी या वृद्ध महिलेने डहाणू येथील एका लोकप्रतिनिधी विरुद्ध डहाणू पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.
डहाणू आशागड रायतली येथील (75) वर्षीय वृद्ध महिला सुकरी रावत्या यांची जमीन आहे.
ही जमीन मुंबई वडोदरा महामार्गात बाधित झाली आहे. या जागेबद्दल डहाणू येथील एका लोकप्रतिनिधींनी या महिलेची 82 लाख रुपयांची फसवणूक केली आहे.
अशी या वृद्ध महिलेने या लोकप्रतिनिधी विरुद्ध डहाणू पोलीस ठाण्यात सोमवार दिनांक 8 जुलै 2024 रोजी लिखित तक्रार केली आहे.
या महिलेची ही जमीन या लोकप्रतिनिधींनी या आधी दहा वर्षाच्या भाडे करारावर घेतली होती. ती तेरा वर्ष पूर्ण होऊन देखील ही जागा या लोकप्रतिनिधींनी या महिलेला परत न करता ती जागा परस्पर विकल्याचा आरोप या महिलेने या लोकप्रतिनिधीवर करून तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी तिने या लोकप्रतिनिधी विरुद्ध डहाणू पोलीस ठाण्यात लिखित तक्रार दाखल केली आहे.



