शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस चे शिवाजीराव सावंत यांचे विभागीय आयुक्त ,जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना निवेदन.

उपसंपादक ——–हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448
शेतकरी राजा आर्थिक संकटात सापडल्याने शेतकऱ्याच्या विविध मागण्यासाठी तुळजापूर विधानसभा उपाध्यक्ष श्री शिवाजी रामकृष्ण सावंत (माजी सैनिक) यांच्यावतीने आयुक्त छत्रपती संभाजीनगर, जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार तुळजापूर यांना मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले.

महाराष्ट्रात अवकाळी पावसाने थैमान घातल्यामुळे जगाचा पोशिंदा शेतकरी राजा आर्थिक संकटात सापडला आहे या संकटात सापडलेले शेतकरी राजाला दिलासा मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तुळजापूर विधानसभा उपाध्यक्ष श्री सावंत यांच्या वतीने जिल्ह्यातील बोगस व खराब प्रतीचे बियाणे विक्री करणाऱ्या दुकानदारावर धाडी मारून बोगस बियाणे जप्त करावी, बी-बियाणे शेतकऱ्याच्या बांधावर वाटप योजना तत्काळ अमलात आणावी,

वेळेवर कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर राशी ५० हजार रुपये योजनेची अंमलबजावणी करावी, शेतकऱ्यांची पीक कर्ज बँकेत अर्ज जमा केल्यापासून ०७ दिवसात कर्ज रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर मिळावी, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सन २०२० ची विमा रक्कम तत्काळ मिळावी, सन २०२३ ला अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केल्याप्रमाणे भरपाई रक्कम पेरण्यापूर्वी मिळावी, डी.ए.पी. व युरिया खताच्या किमतीवर केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अनुदानाची रक्कम वजा करूनच खताच्या किमती आकारण्यात याव्या.वरील मागण्याची दखल शासनाने नाही घेतल्यास तुळजापूर तहसील कार्यालयावर आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.



