अकलूज फेस्टिवल 2023 मोठया उत्साहात संपंन्न.

प्रतिनिधी… रियाज मुलाणी टाईम्स 9मराठी मो 9921500780
दिनांक 27 डिसेंबर ते 31डिसेंबर या कालावधीत चालू असलेल्या “अकलूज फेस्टिवल 2023″चा समरोप मोठ्या उत्साहात आणि जल्लोशात साजरा झाला.
५ दिवस चाललेल्या या महोत्सवात शाहिर राजेंद्र कांबळे प्रस्तुत, महाराष्ट्राची शाहिरी लोकधारा हा अत्यंत नावीन्यपूर्ण कार्यक्रम सादर केला.२८ डिसेंबर रोजी सिने कला दिग्दर्शक वासु पाटील यांचा “खेळ खेळू पैठणीचा” महिलांसाठी बहारदार कार्यक्रम सादर केला.२९ डिसेंबर रोजी मराठमोळ्या पारंपरिक लावण्याचा कार्यक्रम सादर केला.या मध्ये सुमारे ४० नामवंत नृत्यांगना सहभागी झाल्या होत्या.

३० डिसेंबर रोजी रेडिओ FM 93 चे जॉकी RJ बंड्या यांचा महिलांसाठी चालवलेली पैठणीचा व मनोरंजन कार्यक्रम सादर झाला.अकलूजचे सुपुत्र व सध्या इंग्लंड येथे कार्यरत असलेले डॉ.अमोल मोहन भंडारे न्युरोलाॉजिस्ट शास्त्रज्ञ यांना विज्ञान क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल “अकलुज भुषण पुरस्कार जाहीर करण्यात आला.लवकरच त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.३१ डिसेंबर रोजी सिने कलाकार मोनिका करंदीकर यांचा सास्कृतीक आणी मनोरंजनाच्या कार्यक्रम सादर झाला यामध्ये स्थानीक कलाकारांना संधी उपलब्ध करून देण्यात आली.
या वर्षीचा “अकलुज भुषण” पुरस्कार व मानपत्र कु.रिंकु उर्फ (प्रेरणा ) राजगुरू यांना मा.पद्मजादेवी मोहिते पाटील यांचे हस्ते लाखो नागरिकांच्या उपस्थितीत देण्यात आला. यावेळी डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील, डॉ.उर्वशीराजे मोहिते-पाटील मा.मेनकाराजे फाळके सरकार मा.मानसिंगराजे भोसले, सविता व्होरा मा अमृता दिदी हिंगमिरे, विराज खराडे, डॉ सुनिता खराडे उपस्थित होते.रात्री ठिक ११:५८ वाजता काउंटडाऊन झाले नंतर ठिक १२ वाजता भव्य प्रमाणात आतिषबाजी करून नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले.

मावळत्या २०२३ला निरोप देण्यासाठी आणि २०२४च्या स्वागतासाठी तरुणाईमध्ये जोशपूर्ण वातावरण होते.नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक जण विविध ठिकाणी फिरायला जात असतात. यावर्षी अनेक कुटुंबांनी, तरुणांनी अकलुज फेस्टिवल मध्ये नवीन वर्षाचे स्वागत खाद्य पदार्थांचा आस्वाद घेत धमाल मस्तीचे खेळ खेळत केले.
मावळत्या २०२३ला निरोप देण्यासाठी आणि २०२४च्या स्वागतासाठी सर्व महिला,लहान मुले,मली तसेच तरुणाईमध्ये जल्लोष मोठ्या प्रमाणात होता.विशेषता ज्यांनी कधीच नवीन वर्षाचे स्वागत केले नाही असे सर्वसामान्य कुटुंबातील अनेक कुटुंबे मनसोक्तपणे या कार्यक्रमाचा नाचत गात आनंद घेत होते. फेस्टिवल परीसरात विद्युत रोषणाई तसेच जेवणासाठी विविध चवदार पदार्थ उपलब्ध करून देण्यात आले होते. जनसेवा संघटनेचे कार्यकर्त्यांनी अपार कष्ट घेऊन कार्यक्रम यशस्वी केला , कार्यकर्त्यांनी मंदिर परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता.



