महाराष्ट्र

मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय पुढार्‍यांनी देवळाली गावात प्रवेश करू नये, देवळाली येथील सकल मराठा समाज बांधवांनी दिला पुढार्‍यांना इशारा

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

मराठा समाजाला आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत राजकीय पुढार्‍यांनी गावात प्रवेश करू नये असा सज्जड इशारा देवळाली येथील सकल मराठी समाज यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे सदरचे निवेदन देवळाली येथील मराठी समाज बांधवांनी करमाळा येथील तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षक करमाळा यांना निवेदन दिले आहे
देवळाली ता करमाळा येथील ग्रामस्थांनी आज सर्वानूमते जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कूठल्याही राजकीय नेत्याला प्रवेश दिला जाणार नाही अशी शपथ येथील नागनाथ मंदिरात आयोजित बैठकीत घेण्यात आली.

यावेळी उपस्थित बहुसंख्य बहुजन बांधवांनी देखील पाठिंबा दर्शविला. सदरिल आशयाचे निवेदन मा तहसिलदार,पोलिस प्रशासनास देण्यात आले.
यावेळी रोशेवाडी ग्रामपंचायत सदस्य व आरपीआय चे युवा जिल्हाध्यक्ष यशपाल कांबळे यांनी महाराष्ट्रात पहिल्यांदाच मराठा आरक्षणासाठी आपल्या ग्रामपंचायत सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.त्यांच्या या मराठा समाजाप्रतीच्या आपूलकि व बांधिलकी मूळे सकल मराठा समाज देवळाली यांचे वतीने त्यांच्या अभिनंदनाचा विशेष ठराव घेण्यात आला.

मराठी समाजाला आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही गटातील राजकीय पुढार्‍यांनी देवळाली येथे पाय ठेवू नये असा इशारा देवळाली येथील सकल मराठा समाज बांधवांनी दिल्यामुळे राजकीय पुढार्‍यामध्ये एकच खळबळ माजली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button