महाराष्ट्र

कर्मयोगी गोविंद बापू पाटील यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे पार पडलेल्या अंतिम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये कुर्डूवाडी येथील संघाने बारामती क्रिकेट संघाचा पराभव करीत पटकविला कर्मयोगी चषक

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

कुर्डुवाडी संघाने अंतिम सामन्यात बारामती संघाचा पराभव करत कर्मयोगी चषक पटकावला. जेऊर ता. करमाळा येथे गेले आठवडाभर अधिक दिवसापासून सुरू असलेल्या क्रिकेट स्पर्धेची सांगता या अंतिम सामन्यात झाली. कर्मयोगी गोविंद (बापू) पाटील यांच्या ९६ व्या जयंती निमित्त पै पृथ्वीराज पाटील मित्रमंडळ यांच्या वतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती. या कर्मयोगी चषक स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यांनी सहभाग नोंदवला.

या स्पर्धेत ४८ संघ सहभागी झाले. पै. विष्णू शिंदे यांच्या कुशल नियोजनात ही स्पर्धा घेण्यात आली. अंतिम सामना बारामती क्रिकेट संघ (पुणे)  यांच्यात व कुस्ती सम्राट पैलवान असलम काझी क्रिकेट संघ कुर्डुवाडी यांच्यात झाला. बारामती संघाने श्रीगोंदा संघाचा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती तर कुर्डुवाडी संघ केम संघास हरवून फायनल मध्ये आला होता. फुल पीच वर ही स्पर्धा पर पडली. प्रथम येणाऱ्या संघासाठी एक लाख रुपयांचे रोख रकमेचे बक्षीस ठेवण्यात आले होते तर उपविजेता संघास एकाहत्तर हजार रुपयांचे बक्षीस होते.

सेमी फायनल मध्ये प्रवेश करणाऱ्या चारही संघास रोख रक्कम व कर्मयोगी चषक बक्षीस म्हणून देण्यात आले. तसेच अंतिम सामना वीर, सपर्धेचा सर्वोत्तम फलंदाज, गोलंदाज यांना वैयक्तिक चषक आणि रोख  बक्षिसे ठेवण्यात आली होती. तर स्पर्धेचा मानकरी ठरणाऱ्या खेळाडूस रेंजर रेसिंग सायकल बक्षीस देण्यात आली.या स्पर्धेसाठी जिल्हा क्रिकेट अससिएशनच्या पंचांनी काम पाहिले तर इर्शाद बागवान ( सांगोला) यांनी संपूर्ण स्पर्धेसाठी समालोचन केले. टॉस विनर यांचे कडून युट्युब वर सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.

या सामन्याच्या अंतिम सामन्यासाठी माजी आमदार नारायण पाटील, सभापती व डबल उप महाराष्ट्र केसरी अतुल पाटील, कुस्ती सम्राट असलम काझी,सरपंच पृथ्वीराज पाटील, उपसभापती दत्ता सरडे, मल्लखांब असोसिएशन राज्य सचिव पांडुरंग वाघमारे, अशोक नायकवडी, सलीम शेख, ग्रामपंचायत सदस्य उमेश कांडेकर, सुयोग दोशी, सचिन निमगिरे, नाना मोहिते, इकबाल शेख,श्रीमंत विटेकर, सुरवसे सर, सुनील कांबळे तसेच स्पर्धेचे सर्व प्रायोजक उपस्थित होते.

आभार विशाल तकिक यांनी मानले.जेऊर आणि परिसरातील हजारो क्रिकेट रसिकांनी मोठ्या संख्यने प्रत्येक सामन्यात हजेरी लावली व स्पर्धेचा आनंद घेतला. कर्मयोगी चषक स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून पुढील वर्षी सत्तर संघ सहभागी होतील अशी भव्य स्पर्धा आम्ही घेणार असल्याची घोषणा संयोजक विष्णू शिंदे यांनी यावेळी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button