शहर

कोंढवा पोलिसांना पेट्रोलिंग दरम्यान मिळाले वाहनचोर ८ दुचाकी चोरीचे गुन्हे उघड

प्रतिनिधी…रियाज मुलाणी टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो.9921500780

कोंढवा पोलीस ठाणेस वाढत्या प्रमाणात दाखल होणाऱ्या वाहन चोरीच्या गुन्हयांना प्रतिबंध होण्याचे अनुषंगाने कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत दि. १२/१२/२०१३ रोजी सायं. १८/०० वा. चे सुमारास पो. अंम / १०११६ मोसले व पो. अंम/ ९८३८ बनसुडे हे कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलींग करीत असताना आंबेकर हॉटेल चौक पिसोळी येथे एक इसम निळ्या रंगाच्या यमाहा कंपनीच्या दुचाकी वाहनावर बसलेला दिसुन आला.

सदर वाहनाचे मागील व पुढील बाजुस असलेल्या नंबर प्लेटवरील नंबर खोडलेला दिसुन आल्याने त्यांनी त्याचेकडे सदर वाहनाचे कागदपत्राबाबत व लायसन्सबाबत विचारणा केली. तेव्हा तो त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने त्यांनी त्यास गाडीसह कोंढवा पोलीस स्टेशन येथे आणले. त्यावेळी त्याने सदरचे वाहन हे चोरी करुन आणल्याचे सांगितले. सदरबाबत त्यांनी अभिलेख तपासले असता, त्याचेकडे निळुन आलेले वाहन हे कोंढवा पोलीस स्टेशन गुरनं. ११९६ / २०२३ भादवि कलम ३७९ मधील चोरीस गेलेले वाहन असल्याचे निष्पन्न झाल्याने सदरबाबत त्यांनी कोंढवा पोलीस स्टेशनचे दिनेशकुमार पाटील यांना कळविली त्यांनी सदरबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांना कळविली

त्यांना सदर इसमास ताब्यात घेवुन माहीती घेवुन कारवाई करण्यास कळविले तेव्हा त्या इसमास त्याचा नाव व पत्ता विचारता त्याने त्याचे नाव सोहेल मन्सुर पोटोदे, वय १९ वर्षे, धंदा गॅरेजकाम, रा. संभाजी बारणे यांचे ऑफिसचे मागे शिवतीर्थनगर, थेरगाव, पुणे असे असल्याचे सांगितले. व त्याचे ताब्यात मिळून आलेली गाडी जप्त करून त्यास कोंढवा पोलीस स्टेशन येथे घेवुन आले.

पोलीस स्टेशन येथे आणुन त्यास विश्वासात घेऊन त्याचेकडे तपास करता त्याने त्याचा साथीदार विधीसंघर्षीत बालकाचे सोबतीने आणखी पाच दुचाकी चोरल्याचे निष्पन्न करुन ६ दुचाकी जप्त करून १. कोंढवा पोलीस स्टेशन गुरनं.: ११९६ / २०२३ भादवि कलम ३७९, २. कॉढवा पोलीस स्टेशन येथे गुरनं. १८० / २०२३ भादवि कलम ३७९, ३. कोंढवा पोलीस स्टेशन येथे गुरनं ७५६ / २०२३ भादवि कलम ३७९, ४. कोंढवा पोलीस स्टेशन येथे गुरनं ७९७ / २०२३ भादवि कलम ३७९, ५.

कोंढवा पोलीस स्टेशन येथे गुरनं. ७५१/२०२३ भादवि कलम ३७९ ६. लष्कर पोलीस स्टेशन येथे गुरनं. ९४/२०२३ भादवि कलम ३७९ असे सहा गुन्हे उघडकीस आणण्यात आले.

त्याचप्रमाणे दि. १३/१२/२०२३ रोजी रात्री २०/०० वा. चे सुमारास आम्ही स्वता स्टाफसह कोंढवा पोलीस स्टेशन हदीमध्ये पेट्रोलींग करीत असताना खडीमशीन चौक जवळ एक इसम काळ्या रंगाच्या दुचाकी वाहनावर बसलेला दिसुन आला. त्यास हटकले असता तो तेथुन गाडी सोडुन पळु जावु लागला. तेव्हा आम्ही आमचे सोबत असलेल्या स्टाफचे मदतीने त्यास ताब्यात घेऊन त्यास त्याचा नाव व पत्ता विचारता त्याने त्याचे नाव सौरभ राजेंद्र भोसले, वय २३ वर्षे, रा. कोर्टी, सवडी, सोलापुर जिल्हा असे असल्याचे सांगितले,

त्यानंतर त्यास त्याचे ताब्यात असलेल्या दुचाकी वाहनाबाबत चौकशी करता तो उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला. तेव्हा त्यास त्याचे ताब्यात असलेल्या वाहन सोबत घेवुन पोलीस स्टेशनला आणुन त्याचेकडे असलेले दुचाकी वाहन क्र. एमएच १२ डीडी / २७६४ बाबत माहीती घेता. सदरचे वाहन हे चोरीचे असल्याची माहीती प्राप्त झाली व सदरबाबत कोंढवा पोलीस स्टेशनकडील अभिलेख तपासून पाहता सदरबाबत कोंढवा पोलीस स्टेशन येथे गुरनं. १२५३/२०२३ नादवि कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंद असल्याची माहीती प्राप्त झाली. त्याजन्वये सदरचे वाहन जप्त करून त्यास कोंढवा पोलीस स्टेशन येथे आणुन त्यास विश्वासात घेवुन त्याचेकडे तपास करता त्याने एक वाहन आणखी एक दुचाकी चोरी केल्याचे सांगुन त्याचेकडुन ती प्राप्त करण्यात आणुन कोंढवा पोलीस स्टेशनकडील गुरनं. १२५३/२०२३ भादवि कलम ३७९ व कोंढवा पोलीस स्टेशनकडील गुरनं. ११५४ / २०२३ भादवि कलम ३७९ असे दोन गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. अशा तन्हेने वाहन चोरीच्या गुन्ह्याना प्रतिबंध करण्याकरीता लावण्यात आलेल्या पेट्रोलींग दरम्यान एकुण ८ गुन्हे उघडकीस आणण्यात कोंढवा पोलीस स्टेशनचे तपास पथकास यश आलेले आहे.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, श्री मा. अपर पोलीस आयुक्त श्री रंजन कुमार शर्मा, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-५ श्री आर राजा, मा. सहा.पोलीस आयुक्त वानवडी विभाग श्री. शाहुराव साळवे, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संतोष सोनवणे कोंढवा पोलीस स्टेशन, मा. पोलीस निरीक्षक गुन्हे श्री संदीप भोसले व श्री संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे सपोनि दिनेशकुमार पाटील, सपोनि लेखाजी शिंदे, पोलीस अमलदार सतिश चव्हाण, विशाल मेमाणे, निलेश देसाई, लवेश शिंदे, सागर भोसले, संतोष बनसुडें, लक्ष्मण होळकर, सुजीत मदन, शाहीद शेख या पथकाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button