महाराष्ट्र

वांगी विद्युत मंडळाचे नूतन कनिष्ठ अभियंता पूजा सूरवसी यांचा जेऊर येथे वीज वितरण कार्यालयात झाला सत्कार

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

वीज वितरण कंपनीच्या वांगी शाखा चे नूतन कनिष्ठ अभियंता म्हणून नुकतेच विराजमान झालेल्या कुमारी पूजा सूरवसी यांचा जेऊर येथील वीज वितरण कार्यालयात सन्मान करण्यात आला
सदरचा सन्मान जेऊर येथील वीज वितरण कार्यालयाचे जेऊर विभागाचे कार्यकारी अभियंता श्री प्रभास भोईर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला सदरचा सन्मान रोहित इलेक्ट्रिकल कंपनीचे ठेकेदार श्री रावसाहेब नेमाने यांच्या हस्ते सदरचा सत्कार करण्यात आला

यावेळी वांगी शाखा चे कनिष्ठ अभियंता पूजा सूरवसी बोलताना म्हणाल्या की सदरचा सन्मान हा आगळावेगळा असून भविष्यात मी आगळे वेगळे व नावलौकिक असे कार्य करीत राहणार आहे कोणत्याही शेतकरी ग्राहकांच्या तक्रारी येण्या अगोदरच मी त्या माझ्या पद्धतीने माझे वरिष्ठ मार्गदर्शक कार्यकारी अभियंता प्रभास भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली त्वरित सोडविणार असल्याचे त्यांनी सत्काराला उत्तर देताना त्या म्हणाल्या यावेळी जेऊर येथील वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता अशोक काळे, दिग्विजय जाधव सह वीज वितरण कंपनीचे बहुसंख्य कर्मचारी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button