शहर

महाराष्ट्रातील सुरक्षारक्षकांचा गुणगौरव सोहळा 2023सुरक्षा रक्षक कृष्णात पाटील व अनिल जाधव उत्कृष्ट कामगिरी पुरस्काराने सन्मानित

सांगली जिल्हा प्रतिनिधी: आनंद सावंत, टाईम्स 9 मराठी न्यूज, मो. 8007932121

दि.१७-१२-२०२३ रोजी महाराष्ट्रातील सुरक्षारक्षकांचा गुणगौरव सोहळा २०२३ नवी मुंबई येथील कोपरखैरणे महानगरपालिका शाळा क्र.३१ येथे आण्णासाहेब पाटील सभामंडप मध्ये कार्यक्रम प्रवीण विटेकर युट्यूब चॅनेल सहआयोजक संतोष खामकर,दिपक चाळके व त्यांच्या टीमचे सर्व पदाधिकारी यांच्या मार्फत आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य कामगार विभागाचे उपायुक्त व बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाचे अध्यक्ष अशोक डोके साहेब,महाराष्ट्र सुरक्षा रक्षक मंडळाचे जनक माधवराव भोसले यांच्या पत्नी नंदाताई भोसले,अजिंक्य भोसले,लक्ष्मणराव भोसले तसेच इतर सर्व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

सुरक्षा रक्षक कामावर कर्तव्यदक्ष असताना त्यांनी केलेल्या चांगल्या कामाचे म्हणजे आस्थापनेमध्ये लागलेली आग विझवणे,बेवारस मिळालेल्या मौल्यवान वस्तू वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे जमा करणे,व कंपनीमध्ये चोरी करत असणाऱ्या चोरस पकडून देणे आणि विविध स्पर्धांमध्ये पारितोषिक मिळवणाऱ्या सुरक्षा रक्षकांचा गुणगौरव सोहळा या माध्यमातून केला जातो.

त्यात शिराळा तालुक्यातील कृष्णात रामचंद्र पाटील(कणदूर) व अनिल शिवाजी जाधव(ढोलेवाडी) यांचा सन्मान करण्यात आल्याने या भागातून त्यांचे कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button