पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्यातील रक्षक हवालदार झाला भक्षक

टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक: 7030516640
चौकशीसाठी महिलेला बोलवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुका येथील कासा पोलीस ठाण्यात घडली आहे.
याबाबत या पोलीस हवलदाराला रविवारी अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे यांची पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी तडकाफडकी तत्काल बदली करून कासा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक अमर पाटील यांची नियुक्ती केली आहे .आपला पती एका तरुणीसोबत राहतो म्हणून पत्नीने एका (21 वर्षीय) तरुणी विरोधात कासा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीच्या अनुषंगाने कासा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार भोगाडे या महिलेला चौकशीसाठी कासा पोलीस ठाण्यात बोलवत होते.चौकशी दरम्यान हवालदार भोगाडे यांनी या तरुणीशी जवळीक साधून तिला विश्वासात घेऊन पोलीस ठाण्याच्या मागील पोलीस वसाहतीतील एका खोलीत घेऊन जाऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला अशी तक्रार या तरुणीने 07 डिसेंबर 25 रोजी कासा पोलीस ठाण्यात दिल्यावर या हवालदारा विरुद्ध कासा पोलीस ठाण्यात रविवार दिनांक 0 7 डिसेंबर 2025 रोजी रात्री गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.



