फलटणचे सोहेल काझी यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल अकलूज मध्ये सत्कार

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो .97 30 867 448
फलटण गावचे सपुत्र सोहेल सिकंदर काझी यांची महाराष्ट्र पोलीस दलामध्ये उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल अकलूज येथील मदिना मस्जिद, काझी गल्ली , जमातीच्या वतीने व सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चा च्या वतीने “सोहेल काझी” यांचा सत्कार करण्यात आले

याप्रसंगी सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा चे जिल्हाध्यक्ष मुख्तार भाई कोरबू, मदिना मज्जिद चे अध्यक्ष रफिक भाई कोरबू, सचिव हाजी खुदबुद्दीन काझी, इरशाद काझी, हमीद काझी, शाहरुख काझी, हाजी मुसाबाई शेख ,सलीम काझी, काझी सर ,मौलाना महेमुद आलम रिजवी ,यांच्या उपस्थितीमध्ये सत्कार करण्यात आले यावेळी बहुसंख्येने समाज बांधव उपस्थित राहुल सर्वांनी सोहेल काझी यांना पुढील कार्याच्या शुभेच्छा दिल्या तर अकलूज मध्ये झालेल्या या सन्मानाबद्दल सोहेल सिकंदर काझी यांनी सर्वांचे आभार मानले




