सामाजिक

वाणगाव पोलीस ठाणे हद्दीतील चैन चोरी करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांच्या पथकाला यश

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

पालघर जिल्हा प्रतिनिधी

विजय घरत

वाणगाव चिंचणी येथील वृद्ध महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चैन चोरी करून फरार झालेल्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात वाणगाव सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांच्या पथकाला मंगळवार दिनांक 5 डिसेंबर रोजी यश आले आहे. वाणगाव चिंचणी नागेश्वरी आंबेवाडी येथे राहणारी 76 वर्षीय वृद्ध महिला सुधा चुरी 22 नोव्हेंबर 2023 रोजी आपल्या घराच्या ओट्यावर बसली असताना एका अज्ञात इसमाने त्यांचा गळ्यातील दोन तोळ्याची चैन हिसकावून पलायन केले होते.

या आरोपीचा तपास करून त्वरित जेरबंद करण्याच्या आदेश पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिले होते. या आदेशाचे पालन करून उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल विभुते स्थानिक गुन्हे शाखा पालघर व वाणगाव सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांच्या पथकाने कुठलेही धागेदोरे नसताना गोपनीय माहिती व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास करून या गुन्ह्यातील आरोपी हेमंत धर्म मेहेर राहणार चिंचणी धोबीतलाव याला मंगळवार दिनांक 5 डिसेंबर 2023 रोजी अटक करून त्यांच्या ताब्यातील मुद्देमाल जप्त केला आहे. ही चोरी त्यांनी कर्जबाजारी झाल्या असल्या कारणाने केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अल्पेश भिसे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button