शहर

महर्षी प्रशालेत संत गाडगेबाबा जयंतीचे औचित्य साधून शिक्षक आरोग्य तपासणी शिबिर व परिसर स्वच्छता उपक्रम संपन्न.

अकलूज प्रतिनिधी शकुर तांबोळी

शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, महषिॅ शंकरराव मोहिते प्रशाला, यशवंतनगर येथे संत गाडगेबाबा जयंतीचे औचित्य साधून प्रशालेत शिक्षक आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले .प्राथमिक आरोग्य केंद्र शंकर नगर व महा लॅब यांच्या संयुक्तिक नियोजनातून मोफत शिक्षक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते..

       मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन जेष्ठ विधीज्ञ नितीनराव खराडे सभापती महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला यशवंत नगर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांचे आरोग्य हे सर्वांगीण शिक्षणासाठी महत्त्वाचे आहे याच विचारातून मुख्याध्यापक संजय गळीतकर यांच्या मार्गदर्शनातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरामध्ये विविध प्रकारच्या रक्त तपासण्या, सीबीसी ,कॅल्शियम चाचणी थायरॉईड तपासणी, क्रिएटिन इत्यादी चाचणी सुविधा मोफत उपलब्ध करण्यात आल्या होत्या. प्रशाला समिती सदस्य अनिल जाधव,विनोद जाधव,कैलास चौधरी, नितीन इंगवले देशमुख तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षिका वृंद यांनी शिबिरात तपासणी करून घेतली.

 या शिबिरामध्ये प्रामुख्याने प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक कर्मचारी व महा लॅबच्या टेक्निशियन सुवर्णा कारंजे, वैष्णवी पवार, भारती कौलगे, प्रणाली वाघमारे यांनी आपली सेवा बजावली. सदर शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांमार्फत आरोग्य विषयी विशेष मार्गदर्शन करण्यात आले .निरोगी आरोग्य जगण्यासाठी सतत आरोग्य तपासणी व फॅमिली डॉक्टरांशी सल्ला मसलत आवश्यक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

  इयत्ता पाचवी ते आठवीतील सर्व  विद्यार्थ्यांकडून स्वच्छता उपक्रम परिसरात राबवून घेण्यात आला.संत गाडगेबाबांचा स्वच्छता हाच मूलमंत्र यातून विद्यार्थ्यांच्या अंगी बाणवण्यात आला...

       महर्षी प्रशालेतर्फे प्राथमिक आरोग्य केंद्र शंकरनगर व महा लॅब यांचे आभार मानून शिबिराची यशस्वीपणे सांगता करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button