महाराष्ट्र

8 डिसेंबर रोजी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी ओबीसी सभेला उपस्थित रहावे…ओबीसी हक्क संघर्ष समिती अध्यक्ष राजीव पाटील यांचे आवाहन

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.

भ्रमणध्वनी क्रमांक – 7030516640

पालघर जिल्हा ओबीसी संघर्ष समितीची सभा सायलेंट हिल रिसॉर्ट मनोर येथे गुरुवार दिनांक 23 नोव्हेंबर 2023रोजी पार पडली जरांगे पाटील ह्यांनी सर्व मराठा समाजाला ओबीसी च्या कोट्यातून आरक्षण मिळावे म्हणून शासनावर दबाव आणण्याचे काम चालू केले आहे. त्यांचा ओबीसी समाजा विरुद्ध तीव्र विरोध आहे. व त्यासाठी तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय सदर सभेत घेण्यात आला.

मराठा समाजाच्या आरक्षणाला ओबीसीचा विरोध नाही. त्यांना बिहारच्या धर्तीवर जातनिहाय जनगणना करून 50% ची मर्यादा वाढवून आरक्षण द्यावे. परंतु ओबीसी मधून आरक्षण दिल्यास जाती -जातीमध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पालघरमध्ये मुळातच ओबीसी आणि आदिवासी व अनुसूचित जाती समाजाची लोकसंख्या सुमारे 98%आहे. उरलेले 2% मराठा व इतर समाज आहे. असे असताना जरांगे पाटील ह्यांनी बोईसर येथे मराठा मेळाव्याचे आयोजन करून ओबीसी समाजाला डिवचण्याचे काम केले आहे. त्यामुळे ओबीसी समाजामध्ये तीव्र नाराजी आहे.ह्या अगोदरच पेसा कायद्यामुळे पालघर जिल्हात ओबीसी वर अन्याय झालेला आहे.

ह्या सर्व बाबीवर विचारविनिमय करण्यात आला व सर्व ओबीसी चे आंदोलन उभे करण्यासाठी शुक्रवार दि.8 डिसेंबर 2023 रोजी सर्व पक्षीय व सर्व ओबीसी ज्ञातिमंडळाचे पदाधिकारी ह्यांची सभा लायन्स क्लब हॉल पालघर येथे 4 वाजता आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्वांनी सभेस उपस्थित राहावे असे आवाहन ओबीसीहक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष राजीव पाटील, समन्वयक कुंदन संखे, कुणबी सेनेचे नेते विश्वनाथ पाटील ह्यांनी केले आहे. ह्या सभेस निवृत्त सचिव आर. डी. संखे, निवृत्त सनदी अधिकारी भालचंद्र ठाकरे,पी. टी. पाटील, नरेश आक्रे, सुधाकर संखे,मनोज गोऱ्हेकर,भगवान ठाकरे,गोविंद पाटील,पी. जि. सावंत,चंद्रकांत पस्टे, गो. धा. पाटील उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button