महाराष्ट्र

आदिवासी जननायक, स्वातंत्रसैनिक, क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांची १४८ वी जयंती विक्रमगड मध्ये उत्साहात साजरी

(ठाणे प्रतिनिधी) राजेंद्र भगवान भोईर (मो.9028305319) टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

विक्रमगड :- आज दिनांक १५ नोव्हेंबर २०२३ रोजी विक्रमगड येथील तारपा चौक या ठिकाणी विक्रमगड तालुक्यातील सर्व राजकीय पक्ष ,सामाजिक संघटना व विक्रमगड तालुक्यातील नागरीक यांच्या समन्वयाने “आदिवासी कार्यशक्ती समितीच्या” माध्यमातून आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांची १४८ वी जयंती व सह्याद्रीचा ढाण्या वाघ राघोजी भांगरे यांची २१८वी जयंती मोठ्या थाटामाटात,सांस्कृतिक वाद्यांच्या गजरात विक्रमगड शहरात रॅली काढून साजरा करण्यात आली.

सदरची रॅली ही पतंगेश्वर मंदिर येथील तारपा चौकातून सुरू होऊन विठ्ठल रुक्माई मंदिर मार्गे मनोहर रस्ता व मनोर रस्त्याकडून मुख्य बाजारपेठेतून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पुन्हा तारपा चौक अशी काढण्यात आली. त्यानंतर सदर रॅलीचे रूपांतर हे सभेमध्ये झाले. सभेचे अध्यक्षस्थान विक्रमगड आदिवासी कार्यशक्ती समितीचे अध्यक्ष श्री राहुल जी धूम साहेब यांनी भूषवले.विशेष अतिथी म्हणून विक्रमगड तालुक्यातील पंचायत समिती सभापती श्री.यशवंत धर्मा कनोजा साहेब ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते.

पूजनीय बिरसा मुंडा,राघोजी भांगरे यांचे प्रतिमापूजन झाल्यानंतर विविध वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या मध्ये अडव्होकेट गुरुनाथ सहारे , पंचायत समिती विक्रमगड सदस्य श्री मनोज बोरसे,सामाजिक कार्यकर्ते श्री.भालचंद्र मोरघा, श्री अजय जाधव,श्री सुभाष राथड ह्यांनी बिरसा मुंडा व राघोजी भांगरे यांच्या कार्याची माहिती दिली.

विक्रमगड तालुक्यातील सर्व नागरिकांनी विर बिरसा मुंडा व राघोजी भांगरे यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपल्या समाजाला कशाप्रकारे जागृत करून व सामाजिक आर्थिक दृष्ट्या प्रबळ करता येईल याविषयी सन्माननीय सभापती श्री यशवंत कणोजा साहेबांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी आदिवासी कार्यशक्ती समितीचे चिटणीस श्री पुंडलिक फुफाणे ,सदस्य श्री. रमेशजी भरसट, श्री गणपत शेंडे श्री लक्ष्मण सुतार, श्री रामू सुतार यांनी विशेष मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button