शहर

युनिव्हर्सल इंग्लिश स्कूल,जव्हार येथे “वाचन प्रेरणा दिन” उत्साहात साजरा

ठाणे जिल्हा प्रतिनिधी (राजेंद्र भगवान भोईर)- टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

जव्हार:- पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील युनिव्हर्सल इंग्लिश स्कूल, जव्हार मध्ये मिसाईल मॕन भारताचे माझी राष्ट्रपती थोर शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या १५ अॉक्टोंबर या जन्मदिनानिम्मित वाचन प्रेरणा दिन व विश्व विद्यार्थी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरूवात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.पायल मेघपुरीया यांनी डॉ . ए.पी.जे अब्दुल कलाम याच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन केली.

यावेळी शिक्षिकांनी वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व व त्या दिनानिम्मित आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे थोडक्यात माहिती दिली. आपला जीवनात वाचनाचे किती महत्त्व आहे, त्याचप्रमाणे ” एक चांगले पुस्तक शंभर मित्राप्रमाणे असते“. वाचनाने माणुस समृद्ध होतो , जीवनातील अंधकार नाहीसा करण्यासाठी प्रत्येकाला वाचन करता आले पाहिजे.

वाचनामुळे डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम हे आपल्या जीवनात यशाचे शिखर गाठू शकले, हे वाचनाचे महत्त्व विद्यार्थ्याना सांगितले. त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यानी पुस्तकांचे वाचन केले. या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पायल मेघपुरीया, सहाय्यक शिक्षिका सौ.मनिषा घेगड, सौ. गीतांजली भरसट , सौ. हिना मनियार , सौ.साजमिन भुवर व श्री. रुपेश तायडे व सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button