सफाळे रामबाग रोडवर मोटरसायकलचा अपघात… एक जण जागीच ठार तर अन्य तीन जण जखमी
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा
प्रतिनिधी विजय घरत
भ्रमणध्वनी क्रमांक-7030516640
पालघर जिल्ह्यातील सफाळे रामबाग मेन रोडवर मोटर सायकल स्वारांचा अपघात होऊन एका 20 वर्षीय तरुणाचा या अपघातात जागीच मृत्यू झाला आहे.तर अन्य 3 जणांवर मुंबई आणि पालघर येथे उपचार सुरू आहेत. ही घटना सफाळे पोलीस ठाणे हद्दीतील रामबाग मेन रोडवर मंगळवार दिनांक 28 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 6.30 वाजता घडली आहे.या अपघातातील 20 वर्षीय मयत विक्रम कमलाकर पाटील राहणार विळंगी(उत्तर आळी) हा रात्रपाळी करून मंगळवारी सकाळी आपल्या एम टी 150 MH-48 BY 0173
दुचाकीवरून सफाळे येथून आपल्या विळंगी गावातील घराकडे जात असताना तो रामबाग मेन रोडवर आल्यावर त्याच्या समोरून माकुणसार दिशेने रामबाग माकणे येथे जाण्यासाठी रामबाग वळणावर उजव्या बाजूला दुचाकीने वळण घेणारा जयदीप प्रमोद वर्तक व विक्रम कमलाकर पाटील या दोघांमध्ये जबरी ठोकर लागून अपघात झाला याचवेळी विळंगी गावातील प्रकाश गजानन किणी हे आपल्या शाईन मोटरसायकलने त्यांच्या पत्नीला सोडण्यासाठी सफाळे दिशेने जात असताना विक्रम पाटील व जयदीप वर्तक यांची ठोकर लागून झालेल्या अपघातामुळे हे दोघेजण आपल्या मोटरसायकल सह रामबाग मेन रोडवर पडल्यावर या दोन्ही गाडीचा धक्का लागून प्रकाश गजानन किणी व सुजिता प्रकाश किणी हे दोघे नवरा बायको जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी भाईंदर येथील नील ऑर्थोपेडिक या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच जयदीप वर्तक यांच्या हाताला जबरी दुखापत झाल्यामुळे त्यांना देखील पालघर येथील गणेश हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर या अपघातात जबरी जखमी होऊन डोक्याला मार लागून विक्रम पाटील यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत अधिक तपास सफाळे पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली सफाळे पोलीस करीत आहेत.