विशेष

कोशिश करने वाले की कभी हार नही होती ह .भ .प डॉ.बाबुराव हिरडे महाराज मांगी येथे दिग्विजय बागल वाचनालयाच्या वतीने गुणवंतांचा सत्कार

करमाळा प्रतिनिधी

आलिम शेख

मोबाईल नंबर 98 50 68 63 60

मांगी येथील दिग्विजय वाचनालयातर्फे गुणवंतांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता . यावेळी करमाळा तालुक्यातून राज्यसेवा परीक्षा अंतर्गत क्लासवन राजपत्रित अधिकारी पदी निवड झालेले रत्नदीप जगदाळे( हिवरे), रोहिदास शिंदे( मांगी), अक्षय शिंदे (वडगाव), श्री निलेश भोसले (कुंभेज) यांचा मान्यवरांच्या हस्ते , पुस्तक शाल ,श्रीफळ ,फेटा बांधून सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामसुधार समितीचे ह. भ .प . डॉ .बाबुराव हिरडे होते , श्री बाबासाहेब जगदाळेसर, केंद्रप्रमुख संतोष पोतदार सुहास कांबळे ,महेंद्र अवचर ,प्रकाश बागल ,सुजित तात्या बागल. ग्रामसेवक सरडे भाऊसाहेब अदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी डॉ बाबुराव हिरडे यांनी दिग्विजय बागल वाचनालयाचं उपक्रमांचा कौतुक करत उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले “कोशिश करने वाले की कभी हार नही होती।” विद्यार्थ्यांनी भरपूर अभ्यास करायला हवा मोबाईल चा वापर कमी करायला हवा. विद्यार्थ्यांची 16 ते 21 म्हणजेच पाच वर्ष खूप महत्त्वाचे असतात या पाच वर्षात जो विद्यार्थी मनापासून अभ्यासाची मेहनत घेईल तो विद्यार्थी नक्कीच यशाच शिखर गाठतो विद्यार्थ्यांनी अभ्यासामध्ये मेहनत केल्यास त्यांना नक्कीच यश मिळते आणि तेच विद्यार्थी आई-वडिलांचे स्वप्न साकार करू शकतातकाबाडकष्ट करून शिकवणाऱ्या आई-वडिलांचा मुलगा जेव्हा क्लास वन अधिकारी होतो

तेव्हा त्या आई-वडिलांच्या आनंद हा जगातल्या सगळ्या आनंदापेक्षा मोठा असतो.यावेळी मांगीतील ग्रामस्थ प्रताप बागल शशिकांत अवचर ,रवींद्र शिंदे ,सुहास कांबळे गुरूजी, संपत बागल ,अनिल बागल पुरुषोत्तम नरसाळे ,गुलाब क्षीरसागर ,गणेश नरसाळे, सुधाकर नरसाळे, चंद्रकांत राऊत ,रामनाना बागल, प्रकाश ननवरे ,राहुल जाधव, आबा देशमाने ,नितीन शिंदे अभिमान अवचर, ग्रामपंचायत सदस्य स्नेहल अवचर, पोलीस पाटील आकाश शिंदे, शिपाई संजय सोनवणे, ,शहाजी अवचर, सुरेश साठे ,पत्रकार प्रवीण अवचर , प्रेम चव्हाण ,रोहित शिंदे, व विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते. कार्यक्रमाची प्रस्तावना ग्रा.सदस्य सुजित तात्या बागल यांनी केली तर आभार प्रदर्शन ग्रंथपाल श्री बाळासाहेब यांनी केले.यावेळी मांगी येथील दिग्विजय‌ बागल वाचनालया तर्फे मांगी प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली ते चौथी मधील विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button