महाराष्ट्र

पालघर जिल्ह्यातील टेंभिखोडावे सरपंच पदी शोभा पाटील आणि उपसरपंच पदी धनेश गावड यांची बिनविरोध निवड

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक-7030516640

रविवार दिनांक 5 नोव्हेंबर 2023 रोजी पार पडलेल्या पालघर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये सफाळे भागातील टेंभिखोडावे ही एकमेव ग्रामपंचायत बिनविरोध निवड झालेली ग्रामपंचायत आहे.

या ग्रामपंचायतीच्या सरपंच महिला उमेदवारासह अन्य 9 ग्रामपंचायत सदस्यांची देखील या गावातील ग्रामस्थांनी बिनविरोध निवड करून दिली आहे.

या बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचा शपथ पदग्रहण व उपसरपंच बिनविरोध निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी विनायक चव्हाण यांच्या देखरेखीखाली बुधवार दिनांक 22 नोव्हेंबर 2023 रोजी टेंभिखोडावे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पार पडला.

टेंभिखोडावे गावातील ग्रामस्थांनी गावाच्या विकासासाठी बहुमताने एक मत होऊन बिनविरोध म्हणून टेंभिखोडावे गावाच्या सरपंच पदी महिला उमेदवार सौ. शोभा कमलाकर पाटील यांची निवड करून धनेश बळीराम गावड, महादेव कृष्णा गाववड,सौ. शशिकला प्रभाकर गावड, सुरेश बळीराम पाटील, सौ. विजया अरविंद गावड, सौ.शिला दिनेश गायकर, सागर नाना वेडगा, सौ.आरती मंगेश पाटील आणि कुमारी निकिता वंशा पाटील या 9 सदस्यांची देखील बिनविरोध निवड केली होती.

या बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचा शपथ ग्रहणाचा व उपसरपंचाच्या बिनविरोध निवडणुकीचा कार्यक्रम बुधवार दिनांक 22 नोव्हेंबर 2023 रोजी टेंभिखोडावे ग्रामपंचायत कार्यालय येथे निवडणूक निर्णय अधिकारी विनायक चव्हाण यांच्या देखरेखीखाली शांततेत पार पडला यावेळी बिनविरोध निवडून आलेल्या महिला सरपंच पदाच्या उमेदवार सौ.शोभा कमलाकर पाटील यांनी टेंभिखोडावे ग्रामपंचायत सरपंच पदाचा पदभार व उपसरपंचाच्या निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडून आलेले धनेश बळीराम गावड यांनी उपसरपंच पदाचा पदभार स्वीकारला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button