आदिवासी संघर्ष समितीचा विक्रमगड मध्ये विविध मागण्यासाठी रास्ता रोको आंदोलन
(ठाणे प्रतिनिधी) राजेंद्र भगवान भोईर
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
विक्रमगड: पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात आदिवासी संघर्ष समिती, विक्रमगड तालुका पालघर-नाशिक मार्गावरील विक्रमगड येथे सकाळी सात वाजल्यापासुन आदिवासी हक्क व विविध मागण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. या आंदोलनाचे प्रमुख मागण्या…
१) दि. ६ जुलै २०१७ च्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकालांचा सन्मान राखून१७ पदांची सरकारी नोकरभरती त्वरीत करा ,
२) बोगस आदिवासी ची चौकशी करून तात्काळ बडतर्फी करा, ३) आदिवासी कुटुंबाना घरकुल तात्काळ मंजूर करा , रोजगार हमी कामे सुरु करा,
४) धनगर (धनगड) समाजाला आदिवासी समाजच्या S.T (अनुसूचित जमात) आरक्षण देऊन नये,
५) पेसा भरती त्वरीत अंमलबजावणी करावी, इत्यादी मागण्याकरण्या करिता विक्रमगड तालुक्यातील सर्व आदिवासी समाज बांधव रास्ता रोको आंदोलनासाठी एकत्रित जमला होता.