करमाळा येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन दिनांक २६ नोव्हेंबर रोजी होत आहे. स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल एकूण ३७ वर्षांनी माजी विद्यार्थी येणार एकत्रित
करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
करमाळा येथील करमाळा तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित महात्मा गांधी विद्यालयातील सन १९८६ मधील दहावीतील माजी विद्यार्थी तब्बल ३७ वर्षांनी एकत्रित येणार असून या निमित्ताने स्नेह मेळाव्याचे आयोजन येत्या २६ नोव्हेंबर २०२३ रविवारी रोजी हॉटेल राजयोगच्या हॉल मध्ये केली असल्याची माहिती नियोजन समितीचे प्रमुख सिद्धेश्वर मस्कर यांनी दिली
सिद्धेश्वर मस्कर अधिक माहिती देताना म्हणाले की करमाळा येथील महात्मा गांधी विद्यालय मध्ये येते २६ नोव्हेंबर रविवारी रोजी दहावीतील सर्व तुकड्यातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन अर्थात गेट-टुगेदर चा कार्यक्रम आम्ही आयोजित केला असून यामध्ये माजी विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्याचे काम या निमित्ताने होणार असून यात माजी शिक्षकांचा सन्मान होणार आहे सदरचा कार्यक्रम तीन सत्रात चालणार असून सकाळच्या सत्रात माजी विद्यार्थ्यांचे जुन्या आठवणींना उजाळा तर दुपारच्या सत्रात माजी शिक्षकांचा सन्मान होणार आहे
सदरचा कार्यक्रम हा दिवसभर चालणार असून तिसऱ्या सत्रात सायंकाळी ५ वाजता सोहेल मुलाणी यांचा सुगम संगीताचा कार्यक्रम होणार आहे या मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल ३७ वर्षांनी सर्व माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने एकत्रित येणार असल्याचे सिद्धेश्वर मस्कर यांनी बोलताना सांगितले
सन १९८६ मधील दहावीच्या सर्व तुकड्यातील माजी विद्यार्थ्यांनी या निमित्ताने मोठ्या संख्येने एकत्रित येऊन आपल्या जुन्या आठवणींना उजाळा द्यावा व सदर कार्यक्रमाचा लाभ जास्तीत जास्त संख्येने घ्यावा असे आवाहन नियोजन कमिटीच्या वतीने श्री महेश दोशी, डॉ तुषार गायकवाड, फुलारी भाऊसाहेब, दत्ता शिर्के (भाऊसाहेब), विठ्ठल क्षिरसागर, प्रताप कांबळे,अंगद माने (भाऊसाहेब), प्रा.महेंद्र कांबळे, प्रा.सतीश तांगडे प्रा.सौ ज्योति बोकन, अविनाश शहाणे, सुनील काळे, प्रा.अनिल हाके व दिलीप क्षीरसागर यांनी केले आहे.
सन 1986 मधील इयत्ता दहावीतील महात्मा गांधी विद्यालयातील माजी विद्यार्थी तब्बल 37 वर्षांनी एकत्रित येत असल्याने सदरच्या स्नेह मेळाव्या ला एक आगळे वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे