महाराष्ट्र

बावडा नरसिंहपूर मार्गावर एसटीचा मनमानी कारभार,इंदापूर आगाराच्या अनियमित वेळापत्रकाचा विद्यार्थी, प्रवाशांना फटका

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी, मोबाईल – 8378076123

बावडा नरसिंहपूर मार्गावर असणारी एकमेव एसटी बस शाळा सुरू होऊन एक महिन्यानंतर ही वेळापत्रका अभावी मनमानी पद्धतीने सुरू आहे. इंदापूर आगाराच्या मनमानी कारभाराचा विद्यार्थी, भाविक, महिला प्रवाशी व ग्रामस्थांना मोठा फटका बसत आहे. एसटी बस पुर्ववत जुन्या वेळापत्रकानुसार सुरू होणार की अशीच प्रवांश्याविना धावणार असा सवाल केला जात आहे. सध्याला विद्यार्थ्यांना शाळेला चालत येणे जाणे करावे लागत आहे.

नीरा नरसिंहपूर येथील तिर्थक्षेत्र श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर दक्षिणेचे प्रयागतिर्थ म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कुटुंबीयांचे कुलदैवत आहे. तर राज्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्यप्रदेश येथून भाविक सतत पणाने येथे येत असतात. नीरा व भिमा नद्यांच्या संगमावर सतत पणाने भाविक विविध विधी करण्यासाठी येत असतात.

देवस्थानला संगम – नरसिंहपूर, शेवरे – नरसिंहपूर व बावडा – नरसिंहपूर या मार्गाने येण्याची सोय आहे. परंतू राज्यात नावाजलेले तिर्थक्षेत्र असतानाही मात्र येथे येण्यासाठी एकमेव व विना वेळापत्रकाची एसटी बस आहे. त्यामुळे खाजगी वाहतूकीचा वापर करत भाविक, प्रवाशांना प्रवास करावा लागतो आहे. इंदापूर आगाराची असणारी एकमेव एसटी बस मागील तीन महिन्यांपासून बंद केली होती. तर अकलूज आगाराची अकलूज – टेंभुर्णी ही एसटी बस नरसिंहपूर मार्गे दिवसातून दोन फेऱ्या मारत आहे. परंतू सहसा याचा फायदा भाविक, महिला व विद्यार्थी यांना होत नाही.

बावडा नरसिंहपूर मार्गावर इंदापूर आगाराची एकमेव एसटी बस अनेक वर्षांपासून सुरू आहे. पण शालेय विद्यार्थ्यी, भाविक व प्रवासी यांना कोणत्याच उपयोगाची नाही. त्यामुळे या परिसरातील विद्यार्थी, प्रवाशी, महिला यांना शाळा, महाविद्यालय, जवळच्या मोठ्या बाजारपेठा जाण्यासाठी खाजगी गाड्यांना मनमानी पद्धतीचे भाडे देवून जाण्याची वेळ आली आहे.

इंदापूर आगाराच्या अधिकाऱ्यांचा मनमानी कारभाराचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. बावडा नरसिंहपूर मार्गावरील एसटी बस पुर्वीच्या जुन्या वेळापत्रकानुसार पुन्हा सुरू करण्यात यावी अशी मागणी भाविक, विद्यार्थी, प्रवाशी, महिलांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button