महाराष्ट्र

स्वातंत्र्यसैनिक मनोहर पंत चिवटे यांची 41 वी पुण्यतिथी साजरी

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

करमाळा शहराचे प्रथम नगराध्यक्ष तथा गोवा मुक्ती संग्रामात सहभाग घेतलेले ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक साथी मनोहर पंत गणपत चिवटे यांची आज करमाळा पुण्यतिथी साजरी करण्यात आली

ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक अशोक नरसाळे यांच्या हस्ते चिवटे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले
यावेळी जेष्ठ पत्रकार नरसिंह मनोहर चिवटे
नासिर कबीर
शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील
वैद्यकीय कक्ष संबंधित नागेश शेंडगे
रंभापुरा शाखाप्रमुख निलेश चव्हाण
हिवरवाडी चे माजी सरपंच राजेंद्र मिरगळ
पत्रकार तथा तेज वार्ताचे संपादक विशाल परदेशी
संघर्ष न्यूज चे चैनल प्रमुख सिद्धार्थ वाघमारे
सचिन जवेरी अलीम शेख डीजे पाखरे
आदींनी कैलासवासी मनोहर चिवटे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले
साथी मनोहर पंत चिवटे यांनी दैनिक सकाळचे तब्बल 32 वर्षे पत्रकार म्हणून काम केले
ते वृत्तपत्र एजंट म्हणून व्यवसाय करत होते
1952 विधानसभा निवडणूक मनोहर पंत यांनी लढवली होती यावेळी त्यांना आठ हजार मते पडली होती

करमाळा शहरात नागरिक संघटनेची स्थापना करून त्यांनी जनतेतून करमाळा नगरपालिकेची नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवली होती त्यात ते विक्रमी मतांनी विजयी झाले होते व करमाळाचे प्रथम नगराध्यक्ष म्हणून त्यांची इतिहासात नोंद झाली

समाजवादी प्रजा पक्षाचे ते काम करत होते करमाळा नगरपालिकेच्या टाऊन हॉल इमारतीच्या उद्घाटनासाठी जयप्रकाश नारायण यांना निमंत्रित केले होते

महाराष्ट्रातील मधु दंडवते
बाबा कुसुरकर
मधुकर लिमये
रंगां अण्णा वैद्य यांच्याबरोबर त्यांना काम करण्याची संधी मिळाली

गोवा मुक्ती संग्रामात त्यांना सहा महिने तुरुंगास झाला होता

1952 स*** तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल मांगीतलावाच्या उद्घाटनासाठी आल्यानंतर त्यांच्या स्वागताचा नगराध्यक्ष म्हणून पहिला मान साथी मनोहर पंत चिवटे यांना मिळाला होता

यावेळी बोलताना प्राध्यापक अशोक नरसाळे म्हणाले की पत्रकारितेतील नवीन पिढीला स्वातंत्र्यसैनिक मनोहर चिवटे हे आदर्श असून पत्रकारिता आहे सतीचे वाण समजून अन्याय विरुद्ध लिखणी वापरावी
व यातून सर्वसामान्यांचे प्रश्न सुटावेत हीच खरी साथी मनोहर चिवटे यांना श्रद्धांजली ठरेल असे सांगितले

मुख्यमंत्री कार्यालयाचे ओएसडी मंगेश चिवटे
व शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे हे स्वातंत्र्य सैनिक मनोहर चिवटे यांचा समाजसेवेचा वारसा पुढे चालवत आहे याबद्दल प्राध्यापक नरसाळे यांनी समाधान व्यक्त केले

यावेळी करमाळा तालुका पत्रकार संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
09:02