सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीची43 माढा लोकसभा मतदारसंघाची महत्वाच्या बैठकीचे आयोजन

माळीनगर…प्रतिनिधी रियाज -मुलाणी मो. 9921500780
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी माढा लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक खासदार हुसेन दलवाई व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष,तथा सहनिरीक्षक मोहन जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत 43 माढा लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक रविवार दिनांक १३/८/२०२३ रोजी सकाळी १०:०० वाजता इंदापूर रोड -धवल श्रीराम मंदिर अकलूज ता. माळशिरस जि. सोलापूर. येथे आयोजित करण्यात आले आहे.
सदर बैठकीमध्ये 43 माढा लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघाची माहिती घेण्यात येणार आहे.तरी प्रदेश काँग्रेस पदाधिकारी, प्रदेश प्रतिनिधी, जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, तालुका, ब्लॉक,शहर, अध्यक्ष, पदाधिकारी, फ्रंटल, सेल, विभागाचे, जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे माजी सभापती, सदस्य, नगरपंचायत, नगरपरिषदेचे आजी-माजी नगरसेवक,जि.प. गट प्रमुख.व प.स.गण प्रमुख, बूथ प्रमुख व कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित रहावे.आसे आवाहन सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी केले आहे
तसेच 43 माढा लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक खासदार हुसेन दलवाई व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांची माढा लोकसभा मतदारसंघ निवडणूक च्या अनुषंगाने रविवार दिनांक 13 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी एक वाजता धवल श्री राम मंदिर अकलूज येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे तरी या पत्रकार परिषदेस सर्व पत्रकारांनी उपस्थित राहावे असेही आव्हान करण्यात आले आहे.



