पालघर जिल्ह्यातील सफाळे येथील विधीश राऊतची दिल्ली येथे होणाऱ्या शालेय राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी निवड

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक-7030516640
अहमदनगर येथे मंगळवार दिनांक 07 नोव्हेंबर 2023 रोजी पार पडलेल्या शालेय राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत कैलास वाशी चंद्रप्रभा चित्तरंजन श्रॉफ इंग्लिश मीडियम हायस्कूल सफाळे या शाळेमध्ये शिकणाऱ्या सफाळे येथील 12 वर्षीय कुमार विधीश जयेश राऊत यांने 14 वर्षा खालील वयोगटांमध्ये आर्टिस्टिक योगा प्रकारात विजेते पद तर ट्रॅडिशनल योगा प्रकारात तृतीय क्रमांक पटकावला आहे. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे दिल्ली येथे होणाऱ्या शालेय राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी त्याची निवड करण्यात आली आहे.

कुमार विधीश जयेश राऊत हा सफाळे येथील रहिवासी आहे. तो कैलास वासी चंद्रप्रभा चित्तरंजन श्रॉप इंग्लिश मीडियम हायस्कूल सफाळे या शाळेचा विद्यार्थी आहे.लहान वयापासून म्हणजे 6 ते 7 वर्षाचा असल्यापासू विधीश राऊत हा जिल्हा योगा संघटनेच्या उपाध्यक्ष रुचिता ठाकूर यांच्या प्रोत्साहनाने यश विद्या निकेतन विरार या शाळेत योगा प्रशिक्षक शिक्षक फैयाज जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली योगा अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घेत असून त्याने राज्य, जिल्हा मुंबई विभाग अशा योगासन स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन अनेक पारितोषिके व पदके प्राप्त केली आहेत.
त्याच्या या उत्तम कामगिरीमुळे त्याची निवड दिल्ली येथे होणाऱ्या शालेय राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी करण्यात आली आहे.



