महाराष्ट्र

अकलूज च्या नाट्य क्षेत्रातील एक “इरसाल” व्यक्तिमत्त्व…

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

70/80 च्या दशकात अकलूज येथील काही तरुण एकत्र येत “उदय कला पथक” या नाट्य संस्थेची स्थापन करतात,दर्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात,आपली कारकीर्द यशस्वी करण्यासाठी धडपडनाऱ्या याच काही कलावंता पैकी ज्येष्ठ रंगकर्मी स्व युसुफ मोहोळकर यांच्या तिसऱ्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करीत केलेला हा शब्द प्रपंच…

ज्येष्ठ रंगकर्मी युसुफ मोहोळकर यांच्या घरची परिस्थिती जेमतेमच तरीही नाट्य क्षेत्रामध्ये काम करण्याची प्रबळ इच्छा जोपासत असताना मराठी चित्रपटाचे अनभिषिक्त सम्राट “निळू फुले” यांना ते आदर्श मानत,उदय कला पथकात युसूफभाईंच्या वाटेला ज्या ज्या भुमिका आल्या त्या सर्व भुमिका त्यांनी अजरामर करुन दाखवल्या,त्यांच्या याच गुणामुळे पंचक्रोशितील तमाम रसिक मायबाप त्यांना “प्रती निळू फुले” म्हणून ओळखू लागली… त्यांच्या अभिनयात जेवढी सहजता होती तेवढाच त्यांचा हजरजबाबी पणा सुध्दा वाखाणण्याजोगा होता,म्हणूनच की काय मैफील कुणाची हि असो हास्याचे फवारे तिथे उडालेच म्हणून समजा…

लोकनेते स्व प्रतापसिंह मोहिते पाटील साहेब यांच्यावर युसूफभाईंची अपार श्रद्धा,साहेबांच्या निवांत क्षणी विठ्ठल साळुंखे यांच्यासह अनेक हास्य मैफिली आपल्या हजरजबाबी गुणामुळे युसूफ मोहोळकर यांनी अक्षरशः गाजवल्या…

अभिनयाचा कुठलाही वारसा न लाभलेल्या या “अवलिया” ची अजुन एक ओळख म्हणजे त्यांचा “आवाज”… याच आवाजाच्या जोरावर 1991 साली सोलापूर येथे स्व मुकेश यांच्या पुणयतिथीनिमित्त झालेल्या एका गायन स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावून रसिकांची वाह वाह मिळवली…

महाराष्ट्र शाहीर परिषदेचे अध्यक्ष शाहीर योगेश यांनी युसूफ मोहोळकर यांचे नाट्य क्षेत्रातील योगदान पाहत संघटनेची जबाबदारी दिली,शाहीर परिषदेत काम करत असताना कलावंतांच्या मानधन वाढीसाठी वेळोवेळी पाठपुरावा केला आणि गरजवंत लोककलावंताना तो मिळवून हि दिला…

युसूफ मोहोळकर यांना नाट्य क्षेत्रांमध्ये काम करीत असताना स्व प्रेमकुमार भोसले(पंढरपूर),भैय्यासाहेब माने(आत्ता वास्तव्य जूनोनी ता सांगोला),विठ्ठल साळुंखे(टेंभुर्णी),शाहीर आजिनाथ खंडागळे(मा सरपंच,खंडाळी),लक्ष्मण गिरी सराटीकर,शाहीर राजेंद्र कांबळे (खुडुसकर),रियाज चौधरी या सारख्या प्रतिभावान कलावंतांची त्यांना साथ मिळाली…

नाटय क्षेत्रात असामान्य कामगिरी बजावत असताना सोशल मीडियाच्या या झगमगाटात सायकल वर फिरून सत्यता आणि अचूकता साधत निष्कलंक पत्रकारीते चा “आधारस्तंभ” म्हणजे युसूफ मोहोळकर हि ओळख कायम ठेवली…

क्षेत्र कोणतेही असो त्यामध्ये आपला वेगळा ठसा उमटवून आणि पत्रकारीते मध्ये मिळालेल्या संधीच सोन करताना निर्भिड विचारांशी कधीच तडजोड केली नाही…

कोणत्याही जनरेशन मध्ये रमणारा हा अवलिया दोस्ती च्या दुनियेतला राजा माणूस च ठरला,त्यांच्या जाण्याने मित्रत्वाची एक पोकळी निर्माण झाली हे हि नाकारून चालणार नाही,त्यांच्या पश्चात त्यांचे मित्र असणारे रि एक्साईज इंस्पेक्टर निंबाळकर साहेब,टेंभुर्णी चे विठ्ठल साळुंखे,भैय्या साहेब माने,होलार समाजाचे ज्येष्ठ नेते नंदकुमार केंगार,मदारी समाजाचे समशेर भाई,आमचे थोरले चुलते इस्माईलभाई मोहोळकर आणि रफिकभाई मोहोळकर,हाजी जहांगीर शेठ चौधरी यांच्या सह त्यांचे अनेक मित्र मंडळी,पाहुणे रावळे अजुन हि भावुक होऊन आम्हां तिघा भावंडांना मायेचा आधार देत असतात…

माणूस हा किती श्रीमंत आहे हे तो स्वतः ठरवू शकत नाही,परंतु माणसाने या जगात काय कमविले हे पहायचे असेल तर एखाद्या माणसाच्या अंत्य यात्रेत जावे,अगदी असाच प्रत्यय 05/11/”20 या रोजी युसूफ मोहोळकर यांच्या जाण्याच्या दिवशी आला,हा माणूस पैशाने नाही तर माणुसकीने श्रीमंत होता, म्हणुन च पैसा न कमावता सुध्दा अकलूज च्या नाटय क्षेत्रातील एक “इरसाल” असा श्रीमंत माणूस पुन्हा होणे नाही,हे हि तितकेच खरे…

ज्येष्ठ रंगकर्मी युसुफ मोहोळकर यांच्या तिसऱ्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन…

शब्दांकन :- आमीर,मंजूर आणि ताहेर मोहोळकर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button