लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार राजेंद्र गावित यांनी विरार येथील शिव दूतांना सोबत घेऊन केली मोर्चे बांधणीला सुरुवात

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार राजेंद्र गावित यांनी पक्ष मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांची बांधणी करण्यास सुरुवात केली आहे.
शुक्रवार दिनांक 03नोव्हेंबर 2023 रोजी विरार मधील शिवदूतांसोबत बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांना मार्गदर्शन केले. यामुळे कार्यकर्त्यामध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे.
2024 रोजी लोकसभेची निवडणूक होणार आहे. त्यादृष्टीकोनातून पक्षाला बळकटी आणून कार्यकर्त्यांची बांधणी करण्याचे प्रयत्न खासदार राजेंद्र गावित यांनी सुरू केले आहेत. शुक्रवार 03नोव्हेंबर 2023रोजी विरार पूर्वेकडील फुलपाडा भागातील शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सर्व बूथ प्रमुख शिवदुतांची बैठक पार पडली यावेळी या बैठकीत गावित यांनी स्थानिक समस्या, प्रश्न तसेच विविध राजकीय मुद्द्यांवर चर्चा केली . यावेळी गावित यांनी पक्ष संघटना बळकट करण्यासंदर्भात या शिवदूतांना मार्गदर्शन केले.
त्यांनी सर्व शिवदुतांकडून स्थानिक कार्याचा आढावा घेतला. तसेच त्यांच्या समस्या जाणून घेत त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. तसेच
शिवदूतांसह झालेल्या बैठकीमध्ये महिलांना सक्षमीकरणासंदर्भात चर्चा झाली. महिला रोजगाराच्या दृष्टीने वीजेवर चालणाऱ्या शिलाई मशिनचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जेणेकरून महिला स्वत:च्या पायावर उभ्या राहू शकतील. यातून त्या कपडे शिवणे, कपड्यांची डिझायनिंग तसेच विक्री आदी व्यवसाय सुरू करू शकतील. या महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाकडून अर्थ सहाय्य मिळण्यासाठी खासदार गावित सहाय्य करणार आहेत.
खासदार गावित यांनी घेतलेल्या या बैठकीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि चैतन्य निर्माण झाला असून नव्या जोमाने कामाला लागण्याच्या सूचना खासदार गावित यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. या बैठकीत विरार पूर्व शहर प्रमुख उमेश गोवेकर, विरार पूर्व सचिव रोशन चोरघे, महिला आघाडी पद्मा जाधव आणि इतर सर्व बूथ प्रमुख यांच्यासह शिवदूत मोठ्या संख्येने उपस्थित होते.



