महाराष्ट्र विद्युत मंडळ नालासोपारा वायरमन दशरथ गायकवाड यांच्या विरुद्ध लाच स्वीकारल्या प्रकरणी पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे यांनी पेल्हार पोलीस ठाण्यात केला गुन्हा दाखल

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640
महाराष्ट्र विद्युत मंडळाशी संबंधित असलेली कामे करून देणाऱ्या एजंट कडे 5 हजार 400 रुपयांच्या लाचेची मागणी करून 4000 रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी महाराष्ट्र विद्युत मंडळ नालासोपारा येथील एका वायरमन विरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पालघर पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे यांनी शुक्रवारी नालासोपारा येथील पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
एजंट(तक्रारदार )हे महाराष्ट्र विद्युत मंडळ कार्यालय नालासोपारा या भागातील नागरिकांशी संबंधित असलेली नवीन मीटर जोडणी करून देणे तसेच ग्राहकांच्या नावांमध्ये बदल करून देणे अशी कामे करतात यामधील 14 मीटर ग्राहकांचे सर्वे करून दिल्याचा मोबदला म्हणून महाराष्ट्र विद्युत मंडळ नालासोपारा वायरमन दशरथ प्रकाश गायकवाड हा एजंट( तक्रारदार ) यांच्याकडे मोबदल्याच्या स्वरूपात 5400 रुपयांची मागणी करत होता. याबाबत या एजंटने या वायरमनची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय पालघर येथे केली होती.
या तक्रारीची पडताळणी केल्यावर या वायरमनने महाराष्ट्र विद्युत मंडळ नालासोपारा एजंट यांच्याकडून 4000 हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी महाराष्ट्र विद्युत मंडळ संतोष भवन नालासोपारा( पूर्व ) येथील वायरमन दशरथ प्रकाश गायकवाड यांच्या विरुद्ध लाचेची मागणी करून ती लाच स्वीकारल्या प्रकरणी शुक्रवार दिनांक 03 नोव्हेंबर 2023 रोजी नालासोपारा पेल्हार पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



