महाराष्ट्र

कासेगाव (ता. वाळवा) मराठा आरक्षण मोर्चा आणि साखळी उपोषणास अफाट जनसमुदाय साथीला

सांगली जिल्हा प्रतिनिधी : आनंद सावंत, टाइम्स 9 मराठी न्यूज, मो. 8007 93 2121

सांगली : कासेगाव ( ता. वाळवा) गावामध्ये सकल मराठा समाज एकवटला, मराठा समाज आरक्षण पाठिंबा आणि उपोषणास साथ म्हणून गावामध्ये कँडल मोर्चा काढण्यात आला हजारोच्या संख्येने उपस्थित होत तसेच बेमुदत साखळी उपोषण देखील सुरू आहे.

उपोषणाच्या वेळी आंदोलकांनी आपले मत व्यक्त केले त्याचा तपशील

“मी आपणांस नम्रपणे निवेदन / विनंती करू इच्छितो की “आपण आपल्या गावी किंवा शहरी भागात “मराठा आरक्षणासाठी ” मोर्चाचे, आंदोलनाचे, साखळी उपोषणाचे,आमरण उपोषणाचे, कॅन्डल मार्च नियोजन केले आहे.आपणा सर्वांचे मनापासून स्वागत व अभिनंदन.

या निमित्ताने आपणांस आरक्षणाचा ऐतिहासिक संदर्भ देऊ इच्छीतो

राजस्थान मध्ये ” जाठ आरक्षणच्या ” मागणीसाठी आंदोलन सुरू होतं.कालांतराने जाठ आरक्षणच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले नव्हे तर ते हिंसक वळण अगदी जाणीवपूर्वक लावले गेले.

परिणामी राजस्थान मध्ये तत्कालीन काळात झालेल्या जाळपोळ व तोडफोडीत जवळपास 800 ते 900 करोड रूपयांच्या सरकारी मालमत्तेचे नुकसान झाले.

ह्या सर्व प्रकारांमुळे आपसुकच शांततेच्या मार्गाने आरक्षणाची मागणी करणारा ” जाठ ” समुदाय बदनाम झाला तसेच जाठ आरक्षणच्या मागणीसाठी होत असलेल्या आंदोलनातील हवाच निघून गेली.*

अगदी असाच प्रकार गुजरात मध्ये ” पटेल आरक्षणाच्या ” मागणीसाठी होत असलेल्या आंदोलनात देखिल झाला.

पटेल आरक्षणासाठीच्या मागणीसाठी होत असलेल्या आंदोलनाला देखिल राजस्थान प्रमाणे अगदी नियोजन बद्ध पद्धतीने हिंसक वळण लावले गेले.

ह्या हिंसक वळणामुळे सबंध गुजरात मध्ये जवळपास 1,000 एक हजार कोटींपेक्षा जास्त किंमतीच्या सरकारी मालमत्तेचे नुकसान झाले.

परिणामी शांततेच्या मार्गाने अन् संविधानिक मार्गने आरक्षणाची मागणी करणारा ” पटेल समुदाय ” बदनाम झाला.पुढे पटेल आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन करण्याची कुणाचीच हिंमत नाही झाली.

” मराठा आरक्षणाच्या ” मागणीसाठी होत असलेल्या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी आता ” महाराष्ट्रात ” देखिल हाच “राजस्थान व गुजरात पॅटर्न” राबविला जात आहे.

मराठा आरक्षण आंदोलनाला एकदा का हिंसक वळण लागले अन् त्या माध्यमातून महाराष्ट्रात ठिक-ठिकाणी सरकारी मालमत्तेची तोडफोड व जाळपोळ झाली तर मग मात्र आता पर्यंत अगदी जबरदस्त पद्धतीने अन् एका वेगळ्या गनिमी काव्याने, उपोषणाच्या अन् संविधानिक मार्गाने सुरू असणारे आदर्शवत असे ” मराठा आरक्षण आंदोलन ” बदनाम झालेच म्हणून समजा.

सत्तेत बसलेल्या आरक्षण विरोधी अन् दंगे घडवून आणण्यात एक्सपर्ट असलेल्या हैवानी प्रवृत्तीच्या लोकांना नेमकं हेच हवं आहे.

आणि म्हणूनच महाराष्ट्रातील तमाम “सकल मराठा बांधवांना” माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे की कृपा करून आत्ता पर्यंत अगदी योग्य पद्धतीने सुरू असणारे “मराठा आरक्षण आंदोलन” भरकटेल, बदनाम होईल अशा प्रकारचे कोणतेही कृत्य करू नका.

जाळपोळअन्तोडफोडकरूनमराठाआरक्षणआंदोलनालाबदनामकरण्याचाडावहाणून_पाडा.

कासेगाव येथे मराठा आरक्षण साखळी उपोषण सचिन पाटील सुजित पाटील किरण पाटील विजय पाटील बाळकुष्ण पाटील संतोष पाटील जयंत निकम निखिल सावंत जितेद्र पाटील जिवण माने संदीप पाटील प्रशांत पाटील राजेद्र पाटील रंगराव पाटील रविंद्र पाटील दादासो पाटील अतुल लाहिगडे प्रकाश गवारकर संताजी पाटील तसेच मराठा समाजाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button