महाराष्ट्र

सफाळे येथील महिलांचे फेसबुक हॅक करणाऱ्या निखिल पवारच्या मुसक्या आवळण्यात पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे यांच्या पथकाला यश

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क.पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640

फेसबुक हॅक करून त्यांच्या मित्र मैत्रिणीकडून हजारो रुपयांची मागणी करून पैशांची उकळ करणारा विरार येथील फेसबुक हॅकर्स निखिल पवार याला सफाळे पोलीस ठाणे प्रभारी पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे यांच्या पथकाने नालासोपारा येथून मंगळवारी अटक करून त्याला बेड्या ठोकून त्याच्या विरुद्ध सफाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे .

सफाळे येथील दोन महिलांचे फेसबुक हॅक करून त्यांच्या नावाने व त्यांचा फोटो ठेवून नवीन फेसबुक तयार करून विरार येथे राहणारा निखिल संतोष पवार वय वर्ष (25) हा तरुण याआधी सफाळे नंदाडे येथे राहत होता. या तरुणाने या दोघींच्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांकडे या दोघींच्या नावाने डुबलीकेट फेसबुकच्या सहाय्याने पैशांची गरज आहे असे असे भासवून पैशाची मागणी करून हा पैसे उकळत होता.

या बाबत नम्रता (उर्फ राणी) राकेश पाटील वय वर्ष( 35 )हिने 31ऑगस्ट 2023 रोजी सफाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी या आरोपीला लवकरात लवकर जेरबंद करण्याचे आदेश दिले होते.

या आदेशाचे पालन करून पालघर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती नीता पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सफाळे पोलीस ठाणे प्रभारी पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे, महिला पोलीस उपनिरीक्षक प्राजक्ता पाटील, पोलीस हवालदार कल्पेश केनी, पोलीस हवालदार बांगड , पोलीस हवालदार कैलास शेळके, पोलीस हवालदार महेंद्र शर्मा, पोलीस हवालदार रामदास ठानगे, पोलीस शिपाई चिमकर या पथकाने अवघ्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये निखिल संतोष पवार या फेसबुक हॅकर्स आरोपीला मंगळवार दिनांक 31 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी अटक करून त्याला जेरबंद करून बेड्या ठोकल्या आहेत. निखिल संतोष पवार या फेसबुक हॅकर वर मुंबई मालवणी मालाड व कापूरवाडी पोलीस ठाण्यात कोरोना काळातील रेमडीसिवीर इंजेक्शनच्या अपरा-तफरीचे गुन्हे दाखल आहेत .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button